Navapur Car Accident Saam tv
महाराष्ट्र

Navapur Car Accident : दोन कारची समोरासमोर धडक; तीन जण गंभीर, पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश

दोन कारची समोरासमोर धडक; तीन जण गंभीर, पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश

Rajesh Sonwane

सागर निकवाडे

नंदूरबार : नवापूर तालुक्यातील खांडबारा विसरवाडी रस्त्यावर आज दुपारीचा सुमारास दोन कारची समोरासमोर जोरदार धडक (Accident) झाली. यात तीन जण गंभीर जखमी झाले असून (Nandurbar) जखमीत पोलिस कर्मचारीचा समावेश आहे. (Maharashtra News)

नवापूर तालुक्‍यातील खांडबारा– विसरवाडी रस्‍त्‍यावर विसरवाडीच्‍या दिशेने जात असलेली कार व गुजरात राज्यातून नंदुरबारच्या दिशेने जात असलेल्‍या कारची समोरासमोर जोरदार धडक झाली. हा अपघात खांडबारा विसरवाडी रस्त्यावर खातगाव फाट्याजवळ झाला. यात सतीश सिंग (वय २८), दीपक यादव (वय २७) तसेच पोलीस कर्मचारी केशव गावित हे तिघे जण गंभीर जखमी झाले.

जखमी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात

दोन कारचा अपघात झाल्‍याने परिसरातील नागरीकांनी धाव घेतली. यातील जखमी तिघांना १०८ रूग्णवाहिकेतून (Navapur) खांडबारा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तिघेजण गंभीर जखमी असल्याने त्‍यांना ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या अपघातात दोन्ही वाहनांच्या पुढील भाग चक्काचूर झाला असून मोठे नुकसान झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ED Raids : माजी आयुक्त अनिलकुमार पवारांच्या घरी ईडीचा छापा; संपत्ती जाणून डोळे पांढरे होतील, वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Live News Update: ठाण्याच्या नवीन जिल्हाधिकारी म्हणून श्रीमंती अशिमा मित्तल यांची नियुक्ती

Tariff : ट्रम्पचा धक्का, भारताला फटका? कोण-कोणत्या उद्योगांवर होणार परिणाम, जाणून घ्या

Ladki Bahin Yojana : राज्यातील ५० लाख बहिणी अपात्र ठरल्या; काय आहे नेमकं कारण? जाणून घ्या

Somnath Suryawanshi Death: 'सोमनाथचा मृत्यू पोलीस कोठडीतच'; हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम

SCROLL FOR NEXT