Barvi Dam : बदलापूरच्‍या बारवी धरणात ३९ टक्के पाणीसाठा

बदलापूरच्‍या बारवी धरणात ३९ टक्के पाणीसाठी
Barvi Dam
Barvi DamSaam tv
Published On

अजय दुधाणे

बदलापूर : पावसाला सुरुवात झाल्यापासून बारवी धरणात आत्तापर्यंत केवळ ३९ टक्के पाणीसाठा (Badalapur) जमा झाला आहे. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत यंदा हे धरण (Barvi Dam) लवकर भरण्याची आशा निर्माण झाली आहे. (Tajya Batmya)

Barvi Dam
Pune News : पत्नीच्या भावाने तरुणाला अडकवले जादूटोण्यात; ज्‍योतिषाच्‍या माध्‍यमातून लुटले २८ लाख रुपये

जून महिन्याच्या सुरुवातीला बारवी धरणात अवघा २५ टक्के पाणीसाठा होता. जून महिन्याच्या शेवटी पावसाला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत बारवी धरणाच्या पाणी साठ्यात जवळपास १४ टक्के वाढ झाली असून हा पाणीसाठा ३९ टक्के इतका झाला आहे. गेल्या वर्षी बारावी धरणात १० जूनपर्यंत ४३ टक्‍के पाणीसाठा होता. यंदा मात्र हा पाणीसाठा ३९ टक्के इतकाच आहे.

Barvi Dam
Jalgaon News : रेल्वेत नोकरीच्या आमिषाने सात युवकांची फसवणूक; वीस लाखांचा गंडा

पावसामुळे पाण्याची मागणी बंद

ठाणे जिल्ह्याला रोज पाणीपुरवठा करताना पाटबंधारे विभागाकडून पाण्याची असलेली मागणी सध्या पावसामुळे बंद झाल्याने पाणी साठ्यात वाढ होत आहे. पाऊस असाच पडत राहिल्यास जुलैच्या शेवटी किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात बारवी धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची अपेक्षा एमआयडीसीचे अधिकारी व्यक्त करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com