Jalgaon News : रेल्वेत नोकरीच्या आमिषाने सात युवकांची फसवणूक; वीस लाखांचा गंडा

रेल्वेत नोकरीच्या आमिषाने सात युवकांची फसवणूक; वीस लाखांचा गंडा
Jalgaon News
Jalgaon NewsSaam tv
Published On

पाचोरा (जळगाव) : रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमीष दाखवत लोहटार (ता. पाचोरा) येथील ७ तरुणांची २० लाख रूपयांत फसवणूक (Fraud) केल्याप्रकरणी भुसावळ येथील रेल्वे कर्मचारी प्रकाश सोनवणे यांच्याविरोधात पोलिसांनी (Police) फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. (Live Marathi News)

Jalgaon News
Brij Bhushan Singh News: महिला कुस्तीपटूंना अखेर न्याय मिळणार?; ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल

लोहटार (ता. पाचोरा) येथील मोहन चौधरी यांनी दिलेल्‍या तक्रारीत म्हटले आहे की, शेती व्यवसाय करून आम्ही उदरनिर्वाह करतो. भुसावळ येथे रेल्वेत नोकरीस असलेले प्रकाश सोनवणे यांची मुलगी लोहटार येथे असल्याने त्यांचे येणे जाणे होते. त्यामुळे त्यांच्याशी ओळख झाली. त्यांचे व्याही हिलाल गायकवाड यांच्या मध्यस्थीने त्यांनी आमचा विश्वास संपादन केला. परंतु श्री. गायकवाड हे मृत झाले. प्रकाश सोनवणे यांनी तुमचा मुलगा सुरज यास रेल्वेत नोकरी लावून देतो. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी माझी चांगली ओळख आहे, असे सांगून विश्वास संपादन केला.

Jalgaon News
Pune News : पत्नीच्या भावाने तरुणाला अडकवले जादूटोण्यात; ज्‍योतिषाच्‍या माध्‍यमातून लुटले २८ लाख रुपये

गावातील ६ तरुणांना देखील नोकरीचे आमिषाने विश्वासात घेऊन सुमारे २० लाख रुपयांची फसवणूक केली. मोहन चौधरी, राजाराम पाटील, आत्माराम चौधरी, नीलेश चौधरी, रावसाहेब पाटील यांच्याकडून प्रत्येकी तीन लाख व मोतीलाल चौधरी आणि पंकज पाटील यांच्याकडून प्रत्येकी दोन लाख (Railway) रोख स्वरूपात घेतले. फेब्रुवारी २०१४ मध्ये प्रकाश सोनवणे यांनी ७ जणांकडून २० लाख रुपये घेतले. नोकरी लागण्याच्या अपेक्षेने आम्ही सतत त्यांच्याशी संपर्क ठेवला. परंतु आजपर्यंत नोकरी नाही. त्यामुळे त्यांच्याकडे पैसे परत मागितले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देणे संपर्कात न राहणे, असा प्रकार केला. त्यामुळे फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी प्रकाश सोनवणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार प्रकाश पाटील तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com