Navapur News Saam tv
महाराष्ट्र

Navapur News : खदानीत पोहायला गेले असता घडले भयंकर; महिलांच्या मदतकार्याने एकाला जीवदान, एकाचा बुडून मृत्यू

Nandurbar Navapur News : खदाणीतून मोठ्या प्रमाणात माती काढण्यात आली असल्याने येथे मोठं मोठे खड्डे झाले आहेत. यातच पावसाचे पाणी साचल्यामुळे खड्डे समजून येत नाहीत, याच खोल खड्ड्यात गेल्याने तरुण बुडाला आहे

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नवापूर (नंदुरबार) : गावापासून जवळच असलेल्या खदानीत तिघे मित्र फिरत जात पोहण्यासाठी गेले होते. मात्र खोदकाम करण्यात आलेल्या खदाणातील साचलेल्या तलावात एका १७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना नवापूर शहरात घडली आहे. मात्र मेंढपाळातील महिलांनी बचाव कार्य करीत अन्य एका मुलास खदाणीतील पाण्यातून बाहेर काढल्याने त्याचा जीव वाचला आहे. 

नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहरातील रंगेश्‍वर पार्कमध्ये राहणारा हर्ष संदीप नायका (वय १८) असे मृत झालेल्या मुलाचे नाव आहे. दरम्यान हर्ष नायका हा त्याचे निरंजन जितेंद्र साळुंखे (रा.आदर्श नगर), स्मित ऊर्फ साई सतिष गावित (वय १५, रा.आदर्श नगर) असे तिघे मित्र जवळच असलेल्या खदाणी परिसरात गेले होते. याच वेळी हि दुर्घटना घडली आहे. 

खोदकाम करत माती काढण्यात आली 

नवापूर येथील रंगेश्‍वर पार्क, गणेश हिल, आदर्श नगर या वसाहतीपासून काही अंतरावरच खोदकाम करुन माती काढण्यात आल्याने त्याठिकाणी खदाणीचे मोठे खड्डे तयार झाले. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने त्या खदाणीच्या परिसरात पावसाचे पाणी साचल्याने तलावाचे स्वरुप आले आहे. यामुळे खंडणीतील खड्ड्यांचा अंदाज येत नाही. 

एकाला वाचविण्यात यश 

दरम्यान खदाणीतील पाण्यात पोहत असतांना हर्ष संदीप नायका हा पाण्यात बुडाला. त्याला वाचविण्यासाठी निरंज जितेंद्र साळुंखे याने उडी मारत प्रयत्न केले असता तो देखील पाण्यामध्ये बुडू लागला. मात्र परिसरातील महिलांनी वेळीच मदतकार्य करीत बाहेर काढल्याने निरंजन साळूंखे हा युवक सुदैवाने बचावला. मात्र हर्ष हा बुडाला आहे. दरम्यान निरंजन याची प्रकृती गंभीर असल्याने उपचारासाठी निरंजन यास नोबेल हॉस्पीटलमध्ये दाखल केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मित्रानेच खुपसला भारताच्या पाठीत खंजीर, भारतीय तेल टँकरवर इराणची फायरिंग

Bigg Boss Marathi 6 Grand Finale : बिग बॉस मराठीच्या घरातील 'रणरागिणी' चा पत्ता कट; शेवटच्या क्षणी बाजी पलटली | VIDEO

अमेरिका इराण युद्ध पुन्हा भडकणार? होर्मुझवरुन इराणचा अमेरिकेला इशारा

TCS धर्मांतर प्रकरणानंतर मुंबईतही धक्कादायक प्रकार; प्रेमाच्या बहाण्याने १६ वर्षीय तरुणीला पळवलं

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी आवकाळी पाऊस

SCROLL FOR NEXT