Navapur Vidhan Sabha Saam tv
महाराष्ट्र

Navapur Vidhan Sabha : उपमुख्यमंत्र्यांच्या सभेत अडीच हजार लोक म्हणजे उमेदवार किती योग्य हे समजते; अपक्ष उमेदवार शरद गावित

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळत असून अपक्ष उमेदवाराचे देखील येथे आव्हान आहे

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा झाली, मात्र त्यांच्या सभेत दोन ते अडीच हजार लोक असणं हे दुर्दैव आहे. या सभेमुळे व केवळ अडीच हजार लोक असणे, म्हणजे त्यांच्या उमेदवाराची काय परिस्थिती आहे ही समोर आली आहे; अशा शब्दात नवापूरचे अपक्ष उमेदवार शरद गावित यांनी टीका केली आहे. 

नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर (Navapur) विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळत असून अपक्ष उमेदवाराचे देखील येथे आव्हान आहे. अपक्ष उमेदवार शरद गावित यांच्याकडून ग्रामीण भागात जोरदार प्रचार सुरू आहे. दरम्यान महायुतीच्या (NCP) राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारासाठी अजित पवार यांची सभा पार पडली आहे. यावर शरद गावित यांनी निशाणा साधला आहे.  

तिकीट मिळविण्यासाठी त्यांना महिनाभर फिरावे लागले 

काँग्रेसचे उमेदवार शिरीष नाईक हे महिनाभरापासून नाना पटोलेंच्या मागे फिरत होते. त्यानंतर त्यांना तिकीट मिळाले आहे. त्याच पद्धतीने भरत गावित हे देखील अजित पवारांच्या मागे फिरत होते. तेव्हा उमेदवारी त्यांना मिळाली आहे. मात्र मी कुठल्याही पक्षाकडे तिकीट मागायला गेलो नाही. नवापूर विधानसभेतील जनता माझ्यासोबत आहे. मला कुठल्याही पक्षाची किंवा चिन्हाची गरज नाही. यामुळे माझ्या विजय निश्चित आहे; असे विश्वास अपक्ष उमेदवार शरद गावित यांनी व्यक्त केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : मोठी बातमी! भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता, बॅडमिंटन खेळण्यासाठी बाहेर पडला पण घरी परतलाच नाही

Maharashtra News Live Update: कोल्हापूरमध्ये गोकुळच्या २५ जागांसाठी ३०१ इच्छुक

Gold Rate Today : सोन्याचे दर पुन्हा बदलले, १ तोळा खरेदीसाठी किती मोजावे लागणार? वाचा २४,-२२ आणि १८ कॅरेटचे आजचे दर

Why Black Clothes are Avoided During Puja: पूजेच्या वेळी काळे कपडे घालणे का टाळावे?

Latur : दुष्काळासारख्या गंभीर विषयावर बैठक, अधिकारी मात्र मोबाईलमध्ये व्यस्त; संतापजनक VIDEO समोर

SCROLL FOR NEXT