Nandurbar Crime News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Crime News: वैयक्तिक वादातून दिवसाढवळ्या तरुणाचा खून

वैयक्तिक वादातून दिवसाढवळ्या तरुणाचा खून

साम टिव्ही ब्युरो

नंदुरबार : नंदुरबारमध्‍ये एका व्यक्तीचा वैयक्तिक वादातून रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास दिवसाढवळ्या (Nandurbar) धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. या तरुणावर बंदुकीची गोळी झाडल्याचीही चर्चा आहे. मात्र हत्येचे (Crime News) कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी मृत व्यक्तीच्या नातेवाइकास संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे. (Maharashtra News)

नंदुरबार शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील रहिवासी कृष्णा आप्पा पेंढारकर (वय ४०) याचा साक्री नाका परिसरातील उमापती महादेव मंदिराजवळ खून झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलिस अधीक्षक नीलेश तांबे, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे, नंदुरबार शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी पोलिस ताफ्यासह घटनास्थळी पोहचले. त्या ठिकाणी या तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळले.

पोलिसांनी तत्काळ तपास यंत्रणा हलवीत मृत तरुण शहरातील आंबेडकर चौकातील कृष्णा आप्पा पेंढारकर असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी पार्श्‍वभूमी जाणत खून प्रकरणी मृत तरुणाचा नातेवाईक असलेल्या एका युवकास संशयावरून ताब्यात घेतले आहे. घटनेची माहिती शहरात पसरताच मृत तरुणाचे नातेवाईक व संशयिताच्या नातेवाइकांनी नंदुरबार शहर व तालुका पोलिस ठाण्याबाहेर गर्दी केली होती. घटनेच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील काही भागात तत्काळ कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025: पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर; ऐन टूर्नामेंटमध्ये संघाचा 'वॉकओव्हर' नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update: आगळगावात चांदणी नदीच्या पूरात दुचाकीसह वाहून जाणाऱ्या इसमास तरुणांनी वाचवले

Attack On Police: आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला; पाठलाग करत मारहाण, अनेक कर्मचारी AIIMS दाखल

Raj Thackeray: अरे बाबांनो उठा! आपण जिंकलो, पाकिस्तानी हरले! कोण जिंकलं आणि कोण हरलं? राज ठाकरेंच्या व्यंगचित्रात नेमके काय? VIDEO

Coconut Recipe : वाटीभर खोबऱ्यापासून बनवा 'हा' गोड पदार्थ, गावाकडे आहे खूपच प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT