Crime News Saamtv
महाराष्ट्र

Nandurbar News : 2 कारमध्ये दबून सफाई कामगाराचा मृत्यू; धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद, चालकावर गुन्हा दाखल

पाेलिस घटनेचा कसून तपास करीत आहेत.

Siddharth Latkar

- सागर निकवाडे

Nandurbar Crime News : नंदूरबार शहरात एका कारच्या शोरूममध्ये दुर्दैवी घटना घडली. या घटनेत एका सफाई कामगारांचा मृत्यू झाला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. याप्रकरणी एकाविरुध्द नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.(Maharashtra News)

पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार नंदुरबार शहरातील कोकणीहील साईबाबा नगरात राहणारे जितेंद्र वसंत शिरसाठ (वय 42) हे एका कारच्या शाेरुमध्ये सफाई कामगार म्हणुन कामाला होते. नवीन गाड्यांची साफसफाई करण्याचे काम जितेंद्र शिरसाठ हे करीत हाेते. या शाेरुममध्ये विक्रीसाठी असलेली गाडी दिपक इंद्रसिंग राजपूत याने वेगात चालवून अन्य एका गाडीस धडक दिली.

दोन गाड्यांमध्ये जितेंद्र शिरसाठ हे दबले गेले. त्यात ते गंभीर जखमी झाले आणि नंतर त्यांचा मृत्यू झाला. या घटनेबाबतची माहिती सुभाष भगवान बच्छाव यांनी नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात (Nandurbar City Police Station) दिली. त्यानुसार पाेलिसांनी दिपक इंद्रसिंग राजपूत (रा.लक्ष्मीनगर, नंदुरबार) याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Paneer Bhurji Recipe: नाश्त्याला चपातीसोबत खा पनीर भुर्जी, वाचा झटपट रेसिपी

Impact Player नको, एका गोलंदाजाला 5 ओव्हर, सचिन तेंडुलकरने IPL मध्ये सुचवले 3 मोठे बदल

बड्या पोलीस अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू; भरधाव दुचाकी महामार्गावर उभ्या कंटेनरमध्ये घुसली, वाहनांचा चक्काचूर

पाठीवरची चरबी होईल गायब! ब्रा फॅट कमी करण्यासाठी रोज ५ मिनिटांत करा 'हे' ५ सोपे व्यायाम!

Maharashtra News Live Update: शिर्डी नाशिक महामार्गावर भीषण अपघात..

SCROLL FOR NEXT