Nandurbar Crime Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Crime : रस्त्यावर अडवून लूटमार; व्यापाऱ्याजवळची ४५ हजारांची रोकड घेऊन झाले फरार

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यात मागील काही दिवसात चोरी, घरफोडी व रस्तालुटीचे प्रकार वाढले आहेत. काही महिन्यांपासून नंदुरबार शहरातील चोऱ्याचा घटनांमध्ये देखील वाढ झाल्याचे पाहण्यास मिळत आहे

Rajesh Sonwane

नंदुरबार : सायंकाळच्या सुमारास रस्त्यावर रहदारी नसल्याचा फायदा उचलत किराणा दुकानदाराला लुटण्याची घटना नंदुरबारमध्ये घडली आहे. यात व्यापाऱ्याकडे ४५ हजार रुपयांची रोकड घेऊन चोरटे फरार झाले आहेत. या प्रकरणी व्यापाऱ्याने पोलिसात तक्रार दिली आहे. 

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात मागील काही दिवसात चोरी, घरफोडी व रस्तालुटीचे प्रकार वाढले आहेत. काही महिन्यांपासून नंदुरबार शहरातील चोऱ्याचा घटनांमध्ये देखील वाढ झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. यात नंदुरबार शहरापासून १५ ते ३० किलोमीटरवरील काही गावांमध्ये नंदुरबार येथून व्यापारी ये-जा करतात. किराणा, कपडे, मोबाईल, सोने-चांदी यांसह नोकरवर्गही नंदुरबार येथून ये-जा करतात. मात्र (Crime News) दोन दिवसांपूर्वी सायंकाळी पाचच्या सुमारास किराणा व्यापारी दीपक हासाणी दैनंदिन काम आटोपून नंदुरबारकडे येत असताना त्यांना लुटण्याचा प्रकार घडला. 

धानोरा-नंदुरबार रस्त्यावर वेळावद फाटा ते उमर्दे फाटा यादरम्यान दोन अनोळखी तरुण दुचाकीवर उभे झाले. मात्र व्यापारी हासाणी यांनी आपली दुचाकी थांबविली नाही. दोघांनी हासाणी यांच्या धावत्या दुचाकीस लाथ मारून खाली पाडले. तसेच त्यांच्या दुचाकीला लटकविलेली पैशांची पिशवी घेऊन दोघेजण घेऊन फरार झाले. त्यात ४५ हजारांची रोकड होती. यानंतर व्यापाऱ्याने (Nandurbar Police) पोलिसात तक्रार दिली असून याचा तपास सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navi Mumbai: 'मराठी बोलता है' फैझानच्या टोळक्याकडून मराठी तरूणाला मारहाण; हॉकी स्टिकनं काळंनिळं होईपर्यंत मारलं

शाळेत भुत दिसल्याची अफवा; ५०० विद्यार्थी पळत सुटले;VIDEO

Instagram Game: कोणत्याही अ‍ॅपशिवाय इन्स्टाग्रामवर खेळा फ्रिमध्ये गेम, वापरा 'या' ट्रिक्स

Maharashtra Live News Update: शिर्डीच्या साई संस्थानला पुन्हा धमकीचा मेल...

Aditya Thackeray : आदित्य ठाकरेंनी लिहिलेली ८ हिंदी गाणी, १७ वर्षांपूर्वी रिलीज झाला अल्बम

SCROLL FOR NEXT