Nandurbar Crime  Saam Tv
महाराष्ट्र

Nandurbar Crime: अल्पवयीन मुलांसह तरुणांवर लैंगिक अत्याचार, मोबाइलमध्ये २०० हून अधिक अश्लिल व्हिडीओ सापडले; नंदुरबार हादरले

Nandurbar Man physically abused minor boy: नंदुरबारमधून एका २२ वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली. हा तरुण अल्पवयीन मुलं आणि तरुणांचे लैंगिक शोषण करत होता.

Priya More
  • नंदुरबारमध्ये अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण

  • २२ वर्षीय तरुणाला पोलिसांकडून अटक

  • मोबाइलमध्ये २०० पेक्षा जास्त अश्लिल व्हिडीओ सापडले

  • अल्पवयीन मुलं आणि तरुणांना केले ब्लॅकमेल

सागर निकवडे, नंदुरबार

नंदुरबारमध्ये अल्पवयीन मुलांसह तरुणांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला पोलिसांनी अटक केली. आरोपी या मुलांवर अत्याचार करून त्याचे व्हिडीओ तयार करायचा आणि त्यांना व्हायरल करण्याची धमकी द्यायाचा. आरोपींच्या मोबाइलमध्ये पोलिसांना २०० पेक्षा जास्त अश्लील व्हिडीओ आढळून आले. या घटनेमुळे नंदुरबारमध्ये खळबळ उडाली. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. सध्या आरोपीची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

कथित ध्वनीफित प्रकरणांनंतर आता नंदुरबार जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अल्पवयीन बालकांसह तरुणांवर लैंगिक अत्याचार करून त्यांचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो बनवणाऱ्या २२ वर्षीय संशयित तरुणाला पोलिसांनी अटक आहे. संशयिताने २०२२ पासून ६ ऑगस्ट २०२६ पर्यंत अनेक बालकांचे शोषण केले आणि त्यांचे अश्लिल व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल केले.

प्राथमिक तपासात पोलिसांना संशयिताच्या मोबाईलमध्ये तब्बल २०० हून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ आढळून आले असून फॉरेन्सिक पथकाकडून त्यांची तपासणी सुरू आहे. याप्रकरणी संशयिताविरुद्ध पोक्सो आणि बालकांची काळजी आणि संरक्षण कायद्यांतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिस उपनिरीक्षक अमोल देशमुख या प्रकरणी अधिक तपास करत असून पीडितांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे नंदुरबारमध्ये खळबळ उडाली असून मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tomato Storage Tips: टोमॅटो फ्रिजमध्ये ठेवायचा की बाहेर? ताजा आणि चांगला ठेवण्यासाठी जाणून घ्या ७ सोपे उपाय

Maharashtra News Live Update: जेईई मेन परिक्षेच्या तारखा जाहीर, २२ जानेवारी रोजी होणार परीक्षा

Actress Hospitalized: दिग्गज अभिनेत्रीची तब्येत बिघडली; हॉस्पिटल मधील फोटो व्हायरल; नाकातील ट्यूब पाहून चाहते चिंतेत

राज्यसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार; १० सदस्यांचा कार्यकाळ संपणार, कोणाला मिळणार संधी?

Shocking News: आश्रमशाळेत विद्यार्थिनीसोबत भयंकर घडलं, संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह

SCROLL FOR NEXT