Dilip Naik Resigns Before Local Body Elections in Maharashtra Saam
महाराष्ट्र

काँग्रेसला मोठा झटका, बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा, नेमकं कारण काय?

Dilip Naik Resigns Before Local Body Elections in Maharashtra: नंदुरबार जिल्हा काँग्रेसला मोठा झटका, जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

Bhagyashree Kamble

  • नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष पदावरून दिलीप नाईक यांचा राजीनामा

  • जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी दिलीप नाईक यांच्या राजीनामामुळे चर्चांना उधाण

  • काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना राजीनामा पाठवला

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून, काही नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या आहेत. तर, काही प्रभागांतील निवडणुका तसेच नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुका लवकरच होणार आहेत. अशा निवडणुकीच्या वातावरणात नंदुरबारात मोठी राजकीय घडामोड घडली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

नंदुरबारमध्ये  जिल्हा काँग्रेस कमिटीला मोठा धक्का बसला आहे. जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांनी आपल्या पदाचा राजीनामा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना अधिकृतपणे पाठवला आहे. या राजीनाम्यात त्यांनी प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा देत असल्याचं नमूद केलं. त्यांची राजीनाम्याची सध्या चर्चा सुरू आहे.

मात्र, नगरपालिका निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या अगदी काही दिवसांपूर्वीच नाईक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, काँग्रेसच्या स्थानिक संघटनांमध्ये या निर्णयामुळे मोठी खळबळ उडाली असून, येणाऱ्या निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल, याबाबच राजकीय वर्तुळात कुजबुज सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर

PNB Fraud: बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! पंजाब नॅशनल बँकेत २४३४ कोटींचा घोटाळा

Pune : शिक्षिकेला 'I Love You' चा मेसेज पाठवला, ब्लेडने हातावर नाव कोरलं, पुण्यातील विद्यार्थिनीचा धक्कादायक प्रकार

Maharashtra Tourism : नवीन वर्षात फॅमिलीसोबत ट्रेक प्लान करताय? 'हा' आहे महाराष्ट्रातील साधा-सोपा किल्ला

Cholesterol Symptoms: वाढत्या कोलेस्टेरॉलची 5 लक्षणं दिसतील नखांवर, दुर्लक्ष केल्यानं वाढेल हृदयविकाराचा धोका

SCROLL FOR NEXT