Nandurbar News:  Saamtv
महाराष्ट्र

Nandurbar Accident: हृदयद्रावक! मुलाच्या जावळाच्या कार्यक्रमाचे आमंत्रण द्यायला जाताना अपघात; वडिलांचा मृत्यू

Nandurbar News: मुलाच्या जावळाचा कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यासाठी जाणाऱ्या वडिलांचा भीषण अपघातात मृत्यू झाल्याची घटना विसरवाडी नंदुरबार रस्त्यावर घडली. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Gangappa Pujari

सागर निकवाडे, नंदुरबार|ता. ८ एप्रिल २०२४

Nandurbar Accident News:

नंदुरबारमधून एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. मुलाच्या जावळाचा कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यासाठी जाणाऱ्या वडिलांचा भीषण अपघातात मृत्यू झाल्याची घटना विसरवाडी नंदुरबार रस्त्यावर घडली. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, विसरवाडी नंदुरबार रस्त्यावर रविवारी सकाळी आठ वाजता सुमारास निंबोणी गावा जवळील वळण रस्त्यावर दुचाकी स्लीप होऊन अपघात झाला. या घटनेत आपल्या मुलाचा जावळाचा कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यासाठी जाणाऱ्या मानसिंग नानाभाऊ गिरासे या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, मानसिंग नानाभाऊ गिरासे हे रामनवमीला जावळाचा कार्यक्रम असल्यामुळे ते आमंत्रण देण्यासाठी धुळे जिल्ह्यातील टेमलाई तालुका शिरपूर येथे सुरत येथून विसरवाडीच्या दिशेने जात होते. यावेळी खांडबाऱ्याकडे जात असताना निंबोणी गावाजवळील वळण रस्त्यावर त्यांची दुचाकी स्लीप होऊन अपघात झाला. या दुर्घटनेत ते गंभीर जखमी झाले.

या अपघाताची माहिती मिळाल्याने खांडबारा दूर क्षेत्र पोलीस केंद्र यांनी 108 रुग्णवाहिकेला पाचारण करून खांडबारा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान मानसिंग नानाभाऊ गिरासे यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. सदर घटनेची माहिती त्यांच्या नातेवाईकांना कळविण्यात आले त्यानंतर नातेवाईकांनी खांडबारा ग्रामीण रुग्णालय व विसरवाडी पोलीस स्टेशन परिसरात गर्दी केली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

1947 Grocery Price: साखर, मीठ, तेल आणि सोनं...१९४७ मध्ये 'या' गोष्टींची किंमत किती होती?

Maharashtra Live Update: अमरावतीच्या चांदूरबाजार तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस

Krishna Janmashtami 2025: कृष्ण जन्माष्टमीला रात्री करा हे ५ उपाय, घरात नांदेल सुख- शांती

मालेगावात मटण-चिकन शॉप बंद, पालिकेच्या आदेशाचं कडेकोट पालन, VIDEO

Shocking : धक्कादायक! ड्रेनेज लाइनमध्ये उतरलेल्या ३ कामगारांचा मृत्यू, पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT