नंदुरबार : प्रजासत्ताकदिनी एसटी कर्मचाऱ्यांचे भीकमांगो आंदोलन!
नंदुरबार : प्रजासत्ताकदिनी एसटी कर्मचाऱ्यांचे भीकमांगो आंदोलन! SaamTvNews
महाराष्ट्र

नंदुरबार : प्रजासत्ताकदिनी एसटी कर्मचाऱ्यांचे भीकमांगो आंदोलन!

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार

नंदुरबार : नंदुरबार मुख्य आगारात एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने भीक मांगो आंदोलन करण्यात आले. एसटी (ST) कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी भीक मांगो आंदोलनाची दखल आपल्या प्रकृतीतून तंदुरुस्त झालेल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी (Uddhav Thackeray) घेऊन आम्हालाही भीक घालावी अशी अपेक्षा आंदोलन करत या एसटी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

हे देखील पहा :

राज्यात सुरू असलेल्या एसटी संपात नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातूनही चार आगारातून एसटी कर्मचारी गेल्या नव्वद दिवसापासून संपात सहभागी आहे, त्यामुळे गेल्या तीन महिन्यांचे वेतन रखडल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न कर्मचाऱ्यांसमोर समोर पडला आहे. एसटी महामंडळ (MSRTC) कर्मचाऱ्यांना राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी कर्मचारी गेल्या 90 दिवसांपासून संप करीत आहेत.

या संपामुळे कर्मचाऱ्यांना तीन महिन्याचे वेतन मिळाले नाही. त्यासोबतच या संपामुळे महामंडळाचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त (Republic Day) नंदुरबार आगारात एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने भीक मांगो आंदोलन करून राज्य शासनाला जाग यावी व आम्हालाही भीक घालावी अशी मागणी केली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Deepak Kesarkar On Uddhav Thackeray : प्रत्येकाच्या तोंडून बाळासाहेबांची वाक्य शोभून दिसतील असं बिलकुल नाही, केसरकरांचा उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला

Narayan Rane News : दोन्ही ठाकरेंमधून कोण श्रेष्ठ? नारायण राणेंनी सांगितला मनातला 'राज'

RCB Vs GT : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू- गुजरात टायटन्स भिडणार; आकडेवारी प्रत्येकाला थोडी चक्रावूनच टाकणारी!

Rakul Singh : असं रूपडं देखणं त्याला सूर्याचं रे दान

Home Remedies: उष्णता वाढल्याने जिभेला फोड आले आहेत? हे घरगुती उपाय ठरतील फायदेशीर

SCROLL FOR NEXT