सागर निकवाडे
नंदुरबार : आरोग्याचे एक क्रांतिकारी पाऊल ज्यामुळे दुर्गम भागातील लोकांना वेळेवर आरोग्य सेवा मिळू शकेल. सातपुड्याच्या दुर्गम डोंगररांगांमध्ये जिथे पोहोचणे नेहमीच एक आव्हान राहिले आहे. तिथे आता ड्रोन मदतीला धावले आहे. ड्रोनच्या सहाय्याने केवळ १५ मिनिटांत लस आणि औषधे पोहोचवून एक नवा इतिहास रचला आहे. औषधी पोहचविण्याचा राज्यातील हा दुसरा प्रयोग असून यशस्वी झाला आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याचा दुर्गम भाग. जिथे आजही अनेक गावांना जाण्यासाठी रस्ता नाही. सातपुड्यातील १२० च्या आसपास आरोग्य उपकेंद्रांमध्ये सेवा पोहोचवणं हे मोठं आव्हान होत. यामुळे आरोग्य सेवा पोहोचवणं हे नेहमीच मोठं आव्हान राहिले आहे. बिलगाव आरोग्य केंद्र ते सावऱ्या दिगर यासारख्या गावांमध्ये जाण्यासाठी लोकांना होडी किंवा बार्जचा प्रवास करावा लागतो. आरोग्य कर्मचारीही अनेकदा २० किलोमीटरहून अधिक पायपीट करत लस आणि औषध घेऊन जातात. ज्यात चार तासांपर्यंतचा वेळ लागतो. यामुळे लसींच्या योग्य तापमानावर परिणाम होऊन त्या खराब होण्याची भीती असते.
बिलगाव आरोग्य केंद्रातून प्रयोग
आता याच समस्येवर उपाय म्हणून जिल्हा प्रशासन आणि मुंबई आयआयटीने एक महत्त्वाकांक्षी प्रयोग हाती घेतला. तो म्हणजे ड्रोनद्वारे मेडिसिन आणि लसींचा पुरवठा करण्याचा आहे. राज्यातला हा दुसरा यशस्वी प्रयोग ठरला आहे. या चाचणी दरम्यान अक्राणी तालुक्यातील बिलगाव आरोग्य केंद्रातून सावऱ्या दिगर येथे केवळ १५ मिनिटांत २ किलो वजनाचा औषध साठा यशस्वीरित्या पोहोचवण्यात आला. हे ड्रोनचे लोकेशन बिलगाव येथूनच मॉनिटर करण्यात येत होते.
ड्रोनसाठी तयार केले जाणार पिकअप पॉईंट
रस्ते नसल्यामुळे अनेक अडचणी येत होत्या. पण आता ड्रोनमुळे या अडचणी दूर होतील आणि दुर्गम भागातील लोकांनाही वेळेवर आरोग्य सेवा मिळू शकेल. या यशस्वी चाचणीनंतर आता सातपुड्यातील दुर्गम भागात ड्रोनद्वारे नियमितपणे मेडिसिन आणि लसींचा पुरवठा केला जाईल. येत्या काळात अक्कलकुवा आणि अक्राणी तालुक्यांमध्ये हेलिपॅडप्रमाणे ड्रोन उड्डाण घेणारे आणि उतरणारे पिकअप पॉईंट्स तयार केले जाणार आहेत. या ड्रोनमुळे केवळ वेळेचीच बचत होणार नाही, तर मोबाइल नेटवर्कच्या समस्येमुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना करावा लागणारा 20 किलोमीटरचा प्रवासही थांबेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.