Akkalkuwa News Saam tv
महाराष्ट्र

Akkalkuwa News : मरण यातना संपेना; महिलेला सर्पदंश, उपचारासाठी रात्रीच्या अंधारात बांबूच्या झोळीतून जीवघेणा प्रवास

Nandurbar News : अक्कलकुवा तालुक्यातील देव नदीवर पूल नसल्यामुळे पावसाळ्यात नदीला पूर आल्यावर अनेक गावांचा संपर्क तुटतो. त्यामुळे या भागातील आदिवासींना समस्यांना तोंड द्यावे लागते

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : आदिवासी भाग असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात सुविधांचा अभाव कायम पाहण्यास मिळत आहे. यामुळे जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या मरण यातना संपत नसल्याचे चित्र आहे. आरोग्याची समस्या उद्भवल्यास रुग्णाला पायपीट करत न्यावे लागत असते. असाच अनुभव पुन्हा एकदा समोर आला असून महिलेला सर्पदंश झाल्याने तिला तातडीने रुग्णालयात नेणे गरजेचे होते. यामुळे रात्रीच्या अंधारात बांबूच्या झोळीतून जीवघेणा प्रवास करत महिलेला न्यावे लागले. 

नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून माणिकराव कोकाटे जबाबदारी सांभाळत असताना याच जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना मात्र अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. रस्ते, पूल आणि मोबाईल नेटवर्क यांसारख्या मूलभूत सुविधांच्या अभावामुळे येथील जीवन अत्यंत कठीण झाले आहे. अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम भागात राहणाऱ्या एका सर्पदंश झालेल्या महिलेला उपचारासाठी बांबूच्या झोळीतून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागल्याची हृदयद्रावक घटना नुकतीच समोर आली आहे.

भर पावसात कमरे इतक्या पाण्यातून काढली वाट 

अक्कलकुवा तालुक्यातील बारीपाडा येथील रहिवासी असलेल्या सविता माकत्या वळवी या महिलेला सर्पदंश झाला होता. मात्र, त्यांच्या गावाकडे जाण्यासाठी कोणताही रस्ता नसल्यामुळे आणि पावसाचे पाणी सर्वत्र साचल्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात नेणे शक्य नव्हते. अशा परिस्थितीत त्यांच्या नातेवाईकांनी बांबूची झोळी बनवून त्यातून आणण्याचा निर्णय घेतला. भर पावसात, कमरेएवढ्या पाण्यातून आणि चिखलातून तब्बल सात किलोमीटरचा जीवघेणा प्रवास करत त्यांना वेहगी गोंडामालपर्यंत आणण्यात आले. 

पूल नसल्याने गावाशी तुटतो संपर्क  

सदरच्या घटनेने पुन्हा एकदा नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागातील पायाभूत सुविधांच्या अभावाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अक्कलकुवा तालुक्यातील देव नदीवर पूल नसल्यामुळे पावसाळ्यात नदीला पूर आल्यावर अनेक गावांचा संपर्क तुटतो. त्यामुळे या भागातील आदिवासींना वैद्यकीय सेवा, शिक्षण आणि इतर अत्यावश्यक कामांसाठी मोठी कसरत करावी लागते. या भागातील नागरिक रस्ते, पूल आणि मोबाईल नेटवर्कच्या अभावामुळे 'जिवंतपणे मरण यातना' सहन करत असल्याची भावना व्यक्त करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sulakshana Pandit Death: बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्रीचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा

हे तुम्हाला दाखवण्यासाठीच...; मुलीच्या महागड्या साखरपुड्यावरून टीकाकारांना कीर्तनकार इंदोरीकर महाराजांचं उत्तर

Mumbai Local Train: मध्य रेल्वे मार्गावरील अपघात नेमका कसा घडला? मृतांची नावे आली समोर, रेल्वे प्रशासनानं दिली माहिती

नातवासमोरच आजीला लाच घेताना अटक; लाचखोर महिलेच्या डोळ्यातून अश्रू, पोलीस अधीक्षक कार्यालयात नेमकं काय घडलं?

गंभीर गुन्हे दाखल असले तरी निवडणूक लढता येते का? कायदा काय म्हणतो?

SCROLL FOR NEXT