Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Akkalkuwa News : अक्कलकुवा तालुक्यात काँग्रेसला धक्का; पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

Nandurbar News : महापालिका वॉर्ड, जिल्हा परिषद गटांसाठी उमेदवाराचा शोध सुरु झाला. दुसरीकडे तिकीट मिळविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे पाहण्यास मिळत आहे. यातून पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्यास सुरवात

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदुरबार
: जिल्हा परिषद निवडणुकांपूर्वी राजकीय पक्षातील घडामोडींना वेग आला आहे. यात अक्कलकुवा तालुक्यात काँग्रेस पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी पक्षाला रामराम ठोकत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. ग्रामपंचायत सदस्यांसह काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पक्षाची साथ सोडल्याने नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. 

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होऊ घातल्या आहे. दिवाळीनंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी पाहण्यास मिळेल. मात्र यापूर्वीच राजकीय पक्षांमध्ये मोठ्या घडामोडी सुरु झाल्या आहेत. प्रामुख्याने महापालिका वॉर्ड, जिल्हा परिषद गटांसाठी उमेदवाराचा शोध सुरु झाला आहे. तर दुसरीकडे अनेकजण तिकीट मिळविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे पाहण्यास मिळत आहे. यातून पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्यास देखील सुरवात झाली आहे. 

अक्कलकुवा तालुक्यात काँग्रेसला धक्का 

दरम्यान नंदुरबार जिल्ह्यात मागील काही दिवसात मोठ्या घडामोडी होत असून शिवसेना व राष्ट्रवादी पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी पक्षाची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला होता. यानंतर आता काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचे पाहण्यास मिळत आहे. त्यानुसार शिवसेना शिंदे गटात इन्कमिंग सुरू झाली असून अक्कलकुवा तालुक्यात काँग्रेसला धक्का बसला आहे. यामुळे शिवसेनेची ताकद वाढल्याचे बोलले जात आहे. 

शिवसेनेला होणार फायदा 

तालुक्यातील दहेल आणि खोडी येथील पाच ग्रामपंचायत सदस्यांसह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा हात सोडत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिवसेना शिंदे गटाचे अक्कलकुवा- अक्राणी विधानसभेचे आमदार आमश्या पाडवी यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. शिवसेनेत वाढत्या पक्षप्रवेशामुळे अक्कलकुवा विधानसभेत शिवसेनेची ताकद आणखीच वाढणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Hair : ना केस गळती, ना फ्रिझी हेअर; पावसाळ्यातही केस राहतील घनदाट अन् चमकदार, फक्त वापरा 'ही' १ ट्रिक

Maharashtra News Live Update: समृद्धी महामार्गावर धावत्या कारने घेतला पेट

Jalna Bus Accident : जालन्यात भीषण अपघात, दोन एसटी बसेसची समोरासमोर धडक

Blood Pressure by Age: तुमच्या वयोमानानुसार तुमचा BP किती प्रमाणात असला पाहिजे?

पत्नीचा अंगावर काटा आणणारा कट, पतीला मारले अन् मृतदेह बाथरूमखाली गाढला; पोलिसांच्या एका शंकेनं क्रूर कृत्य आले समोर

SCROLL FOR NEXT