Nandurbar Accident Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Accident : भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू

Nandurbar News : दुपारी दोनच्या सुमारास करण चौफुलीकडे दुचाकीने जात होता. त्यावेळी समोरून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने त्यास धडक दिली.

Rajesh Sonwane

नंदुरबार : नंदुरबार शहरातील करण चौफुलीजवळ भरधाव ट्रकने एका दुचाकीला जोरदार धडक दिली. (Nandurbar) यात दुचाकीस्वार युवकाचा जागीच मृत्यू झाला. (Accident) अपघात घडताच ट्रकचालक फरार झाला.  (Tajya Batmya)

विशाल हिरालाल चौधरी (वय ३१) असे अपघातात मृत तरुणाचे नाव आहे. नंदुरबार शहरातील शहादा (Shahada) बायपासला लागून असलेल्या गोकुळधाम सोसायटीतील रहिवासी असलेला विशाल हा दुपारी दोनच्या सुमारास करण चौफुलीकडे दुचाकीने जात होता. त्यावेळी समोरून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने त्यास धडक दिली. त्यामुळे विशाल हा रस्त्यावर फेकला गेला. यात त्याचा डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू (Death) झाला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा) -

दरम्यान, दुपार वेळ असल्याने परिसरात शुकशुकाट होता. काही वेळाने तेथून जाणाऱ्या काही जणांना अपघात झाल्याचे लक्षात आले. त्यात एकाने युवकाला ओळखले. त्यांनी पोलिस व अपघातग्रस्ताच्या कुटुंबीयांना माहिती दिली. पोलिस, युवकाचे मित्र व कुटुंबीयांची घटनास्थळी गर्दी झाली होती. संबंधित युवक फोटोग्राफी व व्हिडिओ शूटिंगचा व्यवसाय करत होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

SCROLL FOR NEXT