Nandurbar Accident Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Accident : मंदिरात नवस फेडण्याचा कार्यक्रम सुरु असताना अनर्थ घडला; भरधाव कार मंदिरात घुसली, मुलगी गंभीर

Nandurbar News : दुपारी मंदिरावर काही भाविक जमल्यानंतर येथे कार्यक्रम सुरू होता. पूजा अर्चा करत भाविक कार्यक्रमात दंग झाले असताना अचानकपणे कार मंदिरात येऊन धडकली. भाविकांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : नंदुरबारच्या कोंडाई माता मंदिरात दुपारच्या सुमारास भाविकांचा कार्यक्रम सुरू होता. याच वेळी रस्त्याने जात असलेली भरधाव कार थेट मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत घुसली. या अपघातात मंदिरात असलेल्या एका सोळा वर्षीय तरुणी गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान अचानक घडलेल्या या प्रकारामुळे भाविकांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. जखमीला लागलीच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

नंदुरबार शहराचे ग्रामदैवत असलेल्या कोंडाई माता मंदीरात आज भरधाव वेगाची कार घुसल्याने अपघात झाला आहे. कोंडाई माता मंदिरात भाविकांची नेहमीच गर्दी असते. त्यानुसार आज दुपारी मंदिरावर काही भाविक जमल्यानंतर येथे कार्यक्रम सुरू होता. पूजा अर्चा करत भाविक कार्यक्रमात दंग झाले असताना अचानकपणे कार मंदिरात येऊन धडकली. या घटनेने मंदिरात असलेल्या भाविकांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला होता.

कारच्या धडकेत मुलगी गंभीर 

विरल विहार कडून येणाऱ्या भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत घुसली. दरम्यान भरधाव कार मंदिरात घुसल्याने यावेळी परिसरात असलेल्या अंजली राजू वैदू (वय १६) हिला कारने जोरदार धडक देत उडविले. यात सदर युवती गंभीर जखमी झाली आहे. अपघातात गंभीर जखमी झालेल्या मुलीला लागलीच नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

नवस फेडण्यासाठी आले होते भाविक 

विशेष म्हणजे अपघातावेळी कोंडाई माता मंदिरात आज नवस फेडण्यासाठी वैदू समाजाच्या भक्तांची मोठी गर्दी होती. कार्यक्रम सुरु असतानाच हा अपघात झाला आहे. अपघातानंतर परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मंदिराचा पुढील परिसरात निमुळता असल्याने त्यात ही चारचाकी अडकल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान कार चालकाला पोलीसांनी ताब्यात घेतले असून अधिकचा तपास सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tmkoc: बाबो! इतक्या वर्षाची झाली 'तारक मेहता' फेम दया भाभी; खरं रूप पाहून आश्चर्य वाटेल

Genelia Deshmukh: जेनियाचं सौंदर्य पाहू वेड लागलं, फोटो एकदा पाहाच

Kitchen Hacks: पावसाळ्यात मीठ भिजण्यापासून संरक्षण कसे करावे? जाणून घ्या सोप्या उपाय

Vastu Shastra: जेवताना तुम्हीही टीव्ही-मोबाईल पाहता का? वास्तु शास्त्र सांगतं थांबा...! नकळत तुम्ही करताय 'या' चुका

Washim Heavy Rain : मुसळधार पावसाने नदीला पूर; पाण्याच्या अंदाज न आल्याने ट्रक पलटी, कॅबिनमध्ये अडकून चालकाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT