Nandurbar Accident Saam TV
महाराष्ट्र

Nandurbar Accident : क्लासवरून घरी जाताना दहावीच्या विद्यार्थिनीला ट्रकची जोरदार धडक; उपचारादरम्यान मृत्यू

10th Student Accident : नेहा पार्क परिसरात राहत होती. शनिवारी नेहमीप्रमाणे ती क्लासला जाण्यासाठी घरातून बाहेर पडली. यावेळी एका डंपरणे तिला जोरदार धडक दिली.

Ruchika Jadhav

सागर निकवाडे

Nandurbar News :

नंदुरबारमध्ये काळीज सुन्न करणारी एक घटना समोर आली आहे. इय्यता दहावीत असणाऱ्या एका विद्यार्थीनीचा अपघातात मृत्यू झालाय. सदर घटनेमुळे परिसरात शोकाकूल वातावरण पसरलं आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, डिंपल सोनार असं मृत विद्यार्थीनीचं नाव आहे. ती नेहा पार्क परिसरात राहत होती. शनिवारी नेहमीप्रमाणे ती क्लासला जाण्यासाठी घरातून बाहेर पडली. यावेळी एका डंपरणे तिला जोरदार धडक दिली. त्यामुळे ती गंभीर जखमी झाली होती.

डिंपल साई कोचिंग क्लासेसमध्ये अभ्यासासाठी गेली होती. क्लासवरून ती सायकलीने घरी परतत असताना धुळे चौफुली येथे डंपरने तिला जोरदार धडक दिली. त्यामुळे ती सायकलीसह खाली कोसळली होती. गाडीने तिला फहरफटत नेले यात ती गंभीर जखमी झाली होती. त्यामुळे तिला जिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते.

गंभीरित्या जखमी झालेल्या विद्यार्थिनीवर उपचार सुरू होते. डॉक्टरांनी तिला वाचवण्यासाठी शर्थिचे प्रयत्न केले. मात्र नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान विद्यार्थिनीचा मृत्यू झाला.

शहरातील धुळे चौफुली परिसरात भरदा वेगाने ट्रक चालक हे वाहन चालवत असतात. मात्र यांच्यावर वेगाचे कोणतेही नियंत्रण नसून यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात घडतात. भरधाव वेगात ट्रक चालवणाऱ्या चालकाविरुद्ध कारवाई करण्याची मागणी आता नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.

राज्यात सध्या १० वीच्या परीक्षा सुरू आहेत. दहावी म्हणजे आपल्या आयुष्याला नवी कलाटणी देणारं वर्ष असतं. दहावीत चांगेल गुण मिळवून काहीतरी मोठं करण्याचं डिंपलचं स्वप्न होतं. मात्र आता हे स्वप्न स्वप्नचं राहिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rakshabandhan 2025: वास्तुशास्त्रानुसार, रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला 'या' भेटवस्तू देऊ नका

BJP : भाजप नेत्याचा मुलाच्या कारमध्ये आढळले ड्रग्स, तरुणीसह पळून जाताना पोलिसाच्या अंगावर चढवली कार

Brain Fog: ब्रेन फॉग म्हणजे काय? कारणे कोणती?

Maharashtra Live News Update: यवतमाळच्या स्वस्तिक प्लाझामध्ये आग

Nagpur News : शाळेची सुट्टी बेतली जीवावर; खोल खड्ड्यात बुडून 2 शाळकरी मुलांचा मृत्यू , नागपुरात हळहळ

SCROLL FOR NEXT