Nandkumar Nanaware And His Wife Saam Tv
महाराष्ट्र

Satara News: नंदकुमार ननावरे आत्महत्या प्रकरण, पोलीस तपासाला वेग येत नसल्याने भावाने बोट छाटलं

Priya More

ओमकार कदम, सातारा

Satara Latest News: फलटण (Falatan) येथील नंदकुमार ननावरे आणि त्यांच्या पत्नीच्या आत्महत्या प्रकरणात (Nandkumar Nanaware Case) पोलीस तपासाला वेग मिळत नसल्याने त्यांचा भाऊ धनंजय ननावरे यांनी टोकाचे पाऊल उचललं आहे. नंदकुमार ननावरे यांच्या भावाने स्वतःचे बोट छाटून ते गृहमंत्र्यांना पाठवणार असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

पोलीस अधिकाऱ्यांकडून योग्य ती उत्तर मिळत नसल्याने अखेर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांना प्रत्येक आठवड्याला शरीराचा एक भाग भेट करणार असल्याचे सांगत ननावरे यांच्या भावाने डाव्या हाताचे एक बोट कापले. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे.

दिवंगत माजी आमदार ज्योती कलानी यांचे स्वीय सहाय्यक नंदकुमार ननावरे यांनी १ ऑगस्टला पत्नीसह राहत्या बंगल्याच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. या घटनेमुळे उल्हासनगरमध्ये एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी बडे यांनी फिर्याद देत संग्राम निकाळजेसह त्याच्या ५ अनोळखी साथीदारांना आरोपी केले होते.

आत्महत्या करण्यापूर्वी ननावरे यांनी आपल्या मोबाईलमध्ये एक व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. त्यात सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात राहणाऱ्या संग्राम निकाळजे, रणजितसिंह नाईक निंबाळकर, वकील ज्ञानेश्वर देशमुख आणि नितीन देशमुख या व्यक्तीच्या त्रासाला कंटाळून आम्ही आत्महत्या करत असल्याचे त्यांनी व्हिडिओमध्ये सांगितले होते.

पोलिसांनी नंदकुमार ननावरे यांच्या मृतदेहाची तपासणी केली असता त्यांच्या पँटच्या खिश्यात एक पत्र त्यांना मिळाले होते. ननावरे यांनी आत्महत्येपूर्वी सुसाइड नोट लिहून ठेवली होती. या सुसाइड नोटमध्ये कमलेश निकम, शशिकांत साठे, नरेश गायकवाड, गणपती कांबळे यांची देखील नावे आहेत.

फिर्यादीत व्हिडिओ आणि सुसाइड नोटच्या आधारे गुन्हा दाखल करीत असल्याचे म्हटले असतानाही रणजितसिंह निंबाळकर, ज्ञानेश्वर देशमुख, नितीन देशमुख, कमलेश निकम, शशिकांत साठे, नरेश गायकवाड, गणपती कांबळे यांची थेट आरोपी म्हणून नावे न टाकता त्यांना सरंक्षण दिले असल्याची खंत नंदकुमार ननावरे यांचा भाऊ धनंजय ननावरे यांनी व्यक्त केली होती.

ननावरे पती-पत्नी आत्महत्या प्रकरणाचा तपास हा विठ्ठलवाडी पोलिसांकडून काढून घेत गुन्हे शाखेला देण्यात आला आहे. धनंजय ननावरे हे मागील आठवड्याभरापासून तपास अधिकाऱ्यांची भेट घेऊन फॉलअप घेत आहेत. पण पोलीस तपासात वेग येत नसल्याने त्यांनी आपल्या शरीराचा एक एक अवयव छाटून गृहमंत्र्यांना पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Numerology Number 7 : पैसे मिळवण्याची कला, स्वतंत्र वृत्ती; ७,१६,२५ तारखेला जन्मलेले व्यक्ती कसे असतात? वाचा भाग्यांक

Pune Road Potholes: पुणे पालिकेची काढली लाज, रस्त्यावरील खड्ड्यांवरून लक्तरं वेशीला; नितीन गडकरी यांची राज्य सरकारला नोटीस

Nanded Politics : सेनापती भाजपात, 'सेना' कांग्रेसमध्ये; विधानसभेत नांदेडमध्ये अशोक चव्हाणांना कुणाचं आव्हान? पाहा व्हिडिओ

Maharashtra News Live Updates : तिरुपती बालाजी मंदिर लाडू प्रसाद प्रकरण,चौकशी करण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

Jalgaon Politics: गिरीश महाजन माझे पाय धरायचे; आता त्यांना जागा दाखवा, खडसेंची भाजपच्या 'संकटमोचका'वर सणसणीत टीका

SCROLL FOR NEXT