Maharashtra Cabinet Meeting Decisions
Maharashtra Cabinet Meeting Decisions Saamtv

Cabinet Meeting Decisions: कॅसिनो कायदा रद्द; गणेशोत्सव, दिवाळीमध्ये १०० रुपयात आनंदाचा शिधा... मंत्रिमंडळ बैठकीत ९ मोठे निर्णय

Maharashtra Cabinet Meeting Decisions : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत ९ मोठे निर्णय घेण्यात आले.
Published on

Maharashtra News: गोव्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांवर कॅसिनो सुरु करण्याचा विचार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनातही याबाबतची चर्चा झाली होती. त्यानंतर आता सर्वात मोठी बातमी समोर येत असून महाराष्ट्र कॅसिनो कायदा रद्द करण्यात आला आहे. तसेच आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत इतरही मोठे निर्णय घेण्यात आले.

Maharashtra Cabinet Meeting Decisions
Beed Rain Update: शेतकरी पुन्हा अस्मानी संकटात; दीड महिन्यापासून पाऊस नसल्याने पिकांनी टाकल्या माना

याबाबत अधिक माहिती अशी की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक मोठे आणि महत्वाचे निर्णय घेण्यात आले. ज्यामध्ये राज्यातील कॅसिनो कायदा रद्द करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला. तसेच आगामी गौरी गणपती, दिवाळीसाठी १०० रुपयात आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने घेतला.

त्याचबरोबर राज्यातील १७ जिल्ह्यांतील सर्व आदिवासी वाडे, पाडे आता मुख्य रस्त्याने जोडण्या संदर्भातील महत्त्वपूर्ण निर्णय ही या बैठकीत घेण्यात आला. एकूण ५ हजार कोटींचा प्रस्ताव या कामासाठी मांडण्यात आला आहे. त्याचबरोबर आयटीआयमधील शिल्प कारागीर प्रशिक्षणार्थींना विद्यावेतनात भरीव वाढ देण्यात येणार आहे. या निर्णयानुसार ५०० रुपये मिळणार आहेत.

Maharashtra Cabinet Meeting Decisions
Kalyan Crime News: बंटी बबली पोलिसांच्या ताब्यात; पोलीस असल्याची बतावणी करत दुकानदाराला गंडा

मंत्रिमंडळ बैठकीत झाले हे महत्वाचे निर्णय..

  • राज्यातील १७ जिल्ह्यांतील सर्व आदिवासी वाडे, पाडे आता मुख्य रस्त्याने जोडणार.

  • ५ हजार कोटींच्या प्रस्तावानुसार भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना राबविणार.

  • गौरी- गणपती तसेच दिवाळीसाठी १०० रुपयात आनंदाचा शिधा मिळणार. ज्यामध्ये प्रत्येकी एक किलोचा रवा, चणाडाळ, साखर, खाद्यतेलाचा समावेश असेल.

  • आयटीआयमधील शिल्प कारागीर प्रशिक्षणार्थींना विद्यावेतनात भरीव वाढ करण्यात आली आहे. या निर्णानुसार आता दरमहा ५०० रुपये मिळणार आहेत.

  • मुंबई प्रेस क्लबला फोर्ट येथे पुनर्विकासासाठी परवानगी देण्यात आली.

  • पावसाळी अधिवेशनात चर्चेत आलेला महाराष्ट्र कॅसिनो कायदा रद्द करण्याचा निर्णय.

  • केंद्र सरकारच्या सूचनांप्रमाणे राज्यात पोषण अभियान कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. सुधारित निर्णयात राज्याचा हिस्सा वाढला.

  • सहकारी संस्था आणि सभासदांबाबतचा २०२३ चा अध्यादेश मागे घेण्यात आला.

  • दुय्यम न्यायालयातील निवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित निवृत्तीवेतन.

  • मंडणगड येथे दिवाणी न्यायालय होणार. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com