Beed Rain Update: शेतकरी पुन्हा अस्मानी संकटात; दीड महिन्यापासून पाऊस नसल्याने पिकांनी टाकल्या माना

Beed News शेतकरी पुन्हा अस्मानी संकटात; दीड महिन्यापासून पाऊस नसल्याने पिकांनी टाकल्या माना
Beed Rain Update
Beed Rain UpdateSaam tv
Published On

बीड : बीड जिल्ह्यावर पुन्हा एकदा दुष्काळी संकट ओढावल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. जवळपास दीड महिन्यांपासून (Rain) पाऊस न झाल्याने अस्मानी संकटाच्या खाईत पुन्हा एकदा बीड जिल्ह्यातील शेतकरी सापडला आहे. सर्वदूर (Beed) पाऊस न झाल्याने उभी पिकं माना टाकत असून करपले आहेत. यामुळे अस्मानी संकटाच्या खाईत जगावं कसं? असा प्रश्न शेतकऱ्यांपुढं उभा ठाकलाय. (Live Marathi News)

Beed Rain Update
Dhule News: सिव्हिल इंजिनिअर तरुणीची नदीत उडी; मच्छीमारांना आढळला मृतदेह

नेहमी अस्मानी आणि सुलतानी संकटाचा सामना करणारा बीड जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा एकदा अस्मानी संकटात सापडला आहे. बीड जिल्ह्यावर भर पावसाळ्यात दुष्काळी परिस्थिती ओढावल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची (Farmer) उभी पिकं माना टाकत आहेत. पावसाळ्याचे अडीच महिने संपले असून जिल्ह्यात जवळपास १ ते दीड महिन्यांपासून पाऊस झाला नाही. यामुळे उभ्या पिकांची पान करपू लागले आहेत. 

Beed Rain Update
Kalyan Crime News: बंटी बबली पोलिसांच्या ताब्यात; पोलीस असल्याची बतावणी करत दुकानदाराला गंडा

बीड जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यांपासून पाऊस झाला नाही. त्यामुळे आमच्या शेतातील सोयाबीन, कापूस, बाजरी माना टाकत आहेत. अगोदरच दुबार पेरणीचे संकट ओढवलं होतं. आता कुठेतरी वाटलं पीक चांगली येतील. मात्र मागच्या दीड महिन्यांपासून पाऊस नसल्याने परिस्थिती वाईट आहे. तर चराटा गाव परिसरात सुरुवातीला पाऊस झाला नाही. यामुळे दुबार पेरणी करून शेतात सोयाबीन केलं. आज दोन महिन्यापासून पाऊस नाही. यामुळे सोयाबीन करपू लागलय. मात्र सरकार लक्ष देत नाही. शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना कोणताच लाभ मिळत नाही. यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे मायबाप सरकार आणि कृषीमंत्र्यांनी आमच्यासारख्या शेतकऱ्यांना आधार द्यावा. अशी मागणी महिला शेतकरी उबाळे यांनी केली


धरणात पाणीसाठाही कमी 
दरम्यान बीड जिल्ह्यात आज दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील धरणांमध्ये केवळ १३ टक्केच पाणी शिल्लक आहे. यामुळे जर महिन्याच्या शेवटपर्यंत पाऊस झाला नाही, तर जिल्ह्यावर मोठं पाणी संकट देखील उभा राहू शकतं. त्याचबरोबर सध्य स्थितीत पिकांचं मोठं नुकसान झालंय. मात्र पुढील ८ दिवसात पाऊस आला नाही, तर उभी पिकं करपून जातील आणि शेतकऱ्यांचे शंभर टक्क्यांपर्यंत नुकसान देखील होऊ शकतं. यामुळे ज्या भागातील शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले त्याचे पंचनामे करून मायबाप सरकारने आधार द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com