Dhule News: सिव्हिल इंजिनिअर तरुणीची नदीत उडी; मच्छीमारांना आढळला मृतदेह

सिव्हिल इंजिनिअर तरुणीची नदीत उडी; मच्छीमारांना आढळला मृतदेह
Dhule News
Dhule NewsSaam tv

धुळे : तापी नदीवरील सावळदे पुलावरून उडी घेऊन तरुणीने आत्महत्या केल्याची घटना आज समोर आली आहे. नदीत (Dhule) मासेमारी करणाऱ्यांना या तरुणीचा मृतदेह पाण्यात तरंगतांना आढळून (Tapi River) आल्यानं हि घटना समोर आली आहे. दरयान पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या आदेशानंतरही जिल्हा प्रशासन सुस्त असल्यामुळे सावळदे पुलावरील आत्महत्यांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. (Breaking Marathi News)

Dhule News
Bribe Case: पोलीस निरीक्षकच अडकला एसीबीच्या जाळ्यात; १० हजार रुपयांची मागितली होती लाच

शिरपूर येथील तापी नदीवरील सावळदे पूल हा मृत्यूचा सापळा बनला असून या ठिकाणी दिवसागणिक आत्महत्या करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. धुळे येथील २४ वर्षीय तरुणीने देखील या सावळदे पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. सिव्हिल इंजीनियरिंग पूर्ण केलेल्या या उच्चशिक्षित तरुणीने हे टोकाचे पाऊल का उचललं? याबाबत अद्यापही कारण स्पष्ट होऊ शकले नाही. तरी दुपारच्या सुमारास अचानक या तरुणीचा मृतदेह परिसरातील मच्छीमारांना पाण्यावर तरंगताना आढळून आला. मच्छीमारांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधून पोलिसांनी तात्काळ मच्छीमारांच्या मदतीने या तरुणीचा मृतदेह पाण्याबाहेर काढला व त्यानंतर हा मृतदेह (Shirpur) शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. यावेळी डॉक्टरांनी या तरुणीला मृत घोषित केले. 

Dhule News
Washim News: लॉजमध्ये काम करणाऱ्या युवकाने संपविले जीवन

पालकमंत्री गिरीश महाजन यांनी महिन्याभरापूर्वी या संदर्भात गांभीर्याने दखल घेण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले होते. तरी देखील याकडे अद्याप जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्यामुळेच आत्महत्या करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांतर्फे लावण्यात येत आहे. आता तरी जिल्हा प्रशासनाने तात्काळ या घटनेची दखल घेत सावळदे पुलावर संरक्षक जाळी बसवावी व पालकमंत्र्यांच्या आदेशाचे तरी पालन जिल्हा प्रशासनाने करावे अशी मागणी स्थानिकांतर्फे करण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com