Washim News
Washim NewsSaam tv

Washim News: लॉजमध्ये काम करणाऱ्या युवकाने संपविले जीवन

लॉजमध्ये काम करणाऱ्या युवकाने संपविले जीवन
Published on

मनोज जयस्वाल

वाशिम : वाशिम शहरातील एका लॉजमध्ये काम करणाऱ्या युवकाने रुममधील छताच्या पंख्याला गळफास लावून (Washim) आत्महत्या केल्याची घटना घडली. हि घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. हा युवक रात्री लॉजमध्ये काम करून दिवसा शिक्षण घेत होता. (Maharashtra News)

Washim News
Parbhani News: पावसाच्या हुलकावणीने पिक करपले; बँकेचे कर्ज फेडीच्या विवंचनेत शेतकऱ्यांचे टोकाचे पाऊल

योगेश मोरे असं आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. आत्महत्या केल्याची माहिती मिळताच लॉज समोर बघ्याची मोठी गर्दी झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह खाली उतरून शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम येथे पाठविण्यात आले आहे.

Washim News
Bribe Case: पोलीस निरीक्षकच अडकला एसीबीच्या जाळ्यात; १० हजार रुपयांची मागितली होती लाच

आत्महत्येचे कारण अस्पष्ट 

योगेशने आत्महत्या का केली? याचे कारण अद्यापही अस्पष्ट असून वाशिम शहर पोलीस याचा तपास करीत आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com