Tension rises as villagers clash over boundary of Zilla Parishad school in Nanded. saam tv
महाराष्ट्र

Nanded ZP School: जिल्हा परिषदेची शाळा कोणत्या गावाची? शाळेचा वाद थेट पोलिसांच्या दारात, काय आहे प्रकरण?

Nanded Zilla Parishad School Row : नांदेडमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेच्या हद्दीवरून दोन गावांमध्ये वाद निर्माण झाला आहे. दोन्ही गावातील शाळेचा वाद आता पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलाय.

Bharat Jadhav

  • नांदेडच्या अर्धापूर तालुक्यात दोन गावांमध्ये वाद

  • लोणी बुद्रुक आणि लोणी खुर्द आमनेसामने

  • जिल्हा परिषद शाळेच्या जागेवरून वाद

संजय सुर्यवंशी, साम प्रतिनिधी

या ना त्या कारणाने दोन गावात वाद झाल्याच्या घटना काही नवीन नाहीत. मात्र चक्क शाळा कोणत्या गावाच्या हद्दीत आहे. या विषयावरून दोन्ही गावातील ग्रामस्थ आमनेसामने आलेत, असून हा वाद थेट पोलीसांच्या दारातही पोहोचला आहे. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील ही घटना आहे. शाळेची वर्गखोली पाडण्यावरून लोणी बुद्रुक आणि लोणी खुर्द या दोन्ही गावात वादाची ठिणगी पडली.

लोणी बुद्रुक आणि लोणी खुर्दच्या सीमेवर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. या शाळेच्या एकूण जागेपैकी निम्मी जागा बुद्रुक तर निम्मी जागा खुर्दच्या ताब्यात देण्यात आलेली आहे. या शाळेपैकी जुनी झालेली खोली क्रमांक एक पाडण्यास काल सुरुवात झाली. पण वर्गखोली आमच्या हद्दीत असल्याचे सांगत खोली पाडण्यास लोणी बुद्रुकच्या ग्रामस्थानी विरोध केला.

लोणी बुद्रुक आणि लोणी खुर्द दोन्ही गावातील ग्रामस्थ एकमेकांसमोर आल्याने परिस्थिती तणावग्रस्त बनली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलीसांनी तात्काळ धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. परवानगी नसताना वर्गखोली पाडण्याचा प्रयत्न झाल्याची लेखी तक्रार लोणी बुद्रुकच्या मुख्याध्यापिकेने अर्धापूर पोलीसात दिली. खोली पाडण्याबाबत तक्रार देण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितल्याने तक्रार दिल्याचे मुख्याध्यापिकेने सांगितले.

लोणी खुर्द शाळेत प्रयोगशाळा बांधण्यासाठी निधी आला. त्या ठिकाणी जुनी वर्गखोली पाडण्यात येत होती. तसे आदेश आमच्याकडे असल्याचे लोणी खुर्द च्या ग्रामस्थांचे म्हणणे आहे. गाव नमुना 8 मध्ये खाडाखोड करून दोन वर्गखोल्या लोणी बुद्रुकच्या ताब्यात असल्याचे दाखवण्यात येत असल्याचा दावा लोणी खुर्दच्या ग्रामस्थानी केला.

याबाबत त्यांनी गट शिक्षणाधिकाऱ्याकडे तक्रार केली. पण लोणी बुद्रुक च्या हद्दीतील वर्गखोली पाडल्याचा आरोप लोणी बुद्रुक च्या ग्रामस्थानी केलाय. पाडकामाचे साहित्य रस्त्यावर टाकून लोणी बुद्रुकचा रस्ताही अडवल्याचा आरोप आहे. या सर्व प्रकारामुळे मात्र शाळेच्या विषयावरून दोन गावं एकमेकाविरोधात उभे टाकली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT