Nanded Unseasonal Rain Saam TV
महाराष्ट्र

Nanded Unseasonal Rain: अंगावर वीज पडून तरुणाचा मृत्यू; नांदेडमध्ये अवकाळी पावसाचं थैमान

Ruchika Jadhav

संजय सूर्यवंशी

Unseasonal Rain:

विदर्भासह मराठवाड्यात काही ठिकाणी अवकाळी पावसानं थैमान घातलं आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे एका तरुणाला आपला जीव गमवावा लागलाय. नांदेड (Nanded) जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील पिंपळकोठा येथे वीज पडून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.

दत्ता दिगंबर वाघमारे असं या वीज (lightning) पडून मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. हा तरुण शेतातून घरी परतत असताना अचानक वादळी वारा आला आणि अवकाळी पाऊस सुरू झाला. झाडाचा आधार घेऊन तरुण थांबला होता. पाऊल कमी झाला की घरी जाऊ असा विचार त्याच्या मनात सुरू होता. मात्र त्याच्या नशिबात भलतंच लिहिलं होतं.

पावसापासून वाचण्यासाठी ज्या झाडाचा आसरा घेतला त्याच झाडाखाली आपला मृत्यू लिहिलाय याची पुसटशीही कल्पना त्याच्या मनात आली नाही. वीज पाडल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.

एकीकडे अवकाळी तर दुसकरीकडे दुष्काळ

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं हवामान पाहायला मिळत आहे. विदर्भासह मराठवाड्यातील काही गावांत मुसळधार पावसासह गारपीट झाली आहे. तर काही अहमदनगर आणि नाशिक या जिल्ह्यांमधील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी देखील वणवण करावी लागत आहे. उन्हाळ्याआधीच काही ठिकाणी दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: सांगली.. प्रभाकर पाटील कमळ ऐवजी घड्याळ घेऊन उतरणार मैदानात !

Viral Video : क्लास रूमध्ये पोरींचा जोरजोरात वाद, पोराला राग अनावर, डेस्कवरुन उठला अन्...

Ajinkya Rahane: योगायोग की आणखी काही...; टीम इंडिया फ्लॉप ठरताच अजिंक्य रहाणेने केली सूचक पोस्ट, म्हणाला...!

Jharkhand Assembly Election : जागावाटप ठरलं! काँग्रेस २९ तर झामुमो 43 जागांवर लढणार, RJD ला किती जागा मिळाल्या?

APY Scheme: दररोज ७ रुपये गुंतवा अन् ५ हजारांची पेन्शन मिळवा; अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक कशी करायची?

SCROLL FOR NEXT