Vande Bharat Express Saam Tv
महाराष्ट्र

नांदेडकरांचे स्वप्न सत्यात उतरले, २४ तासात वंदे भारत धावणार, वाचा A टू Z माहिती

Nanded-Mumbai Vande Bharat Express : नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. नांदेडहून मुंबईपर्यंतचा प्रवास ९ तास २५ मिनिटांत पूर्ण होणार आहे. या गाडीत २० डब्बे असून, एकूण १४४० आसन क्षमता आहे.

Namdeo Kumbhar

  • नांदेडकरांचे स्वप्न सत्यात, मुंबई-वंदे भारत एक्सप्रेस धावणार.

  • ६१० किमी अंतर ९ तास २५ मिनिटांत पूर्ण होणार.

  • आठवड्यातून सहा दिवस धावणार, २० डब्ब्यांची सुविधा.

  • परभणी, औरंगाबाद, नाशिक, ठाणे, दादर या प्रमुख स्थानकांवर थांबे.

Nanded to Mumbai in Just 9 Hours via Vande Bharat Express : नांदेडकरांचे स्वप्न अखेर सत्यात उतरणार आहे. मंगळवारी नांदेडहून वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. मुंबई-जालना वंदे भारतचा नांदेडपर्यंत विस्तार करण्यात आला आहे. मंगळवारी सकाळी नांदेड-मुंबई या वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहे. यावेळी नांदेडचे भाजप खासदार अशोक चव्हाण, पदाधिकारी, रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहाणार आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून नांदेडकरांकडून वंदे भारत एक्सप्रेसची मागणी करण्यात येत होती. लोक प्रतिनिधींकडूनही वंदे भारतच्या मागणीचा जोर होता. त्याला रेल्वेकडून ग्रीन सिग्नल देण्यात आला. जालना-मुंबई ही वंदे भारत एक्स्प्रेस पुढे नांदेडपर्यंत विस्तार करण्यात आला. नांदेड-मुंबई ही वंदे भारत एक्सप्रेस आता ६१० किलोमीटरचे अंतर फक्त ९ तास २५ मिनिटांत पूर्ण करणार आहे.

नांदेड मुंबई वंदे भारत एक्सप्रेस आठवड्यातून सहा दिवस धावणार आहे. या रेल्वेला २० डब्बे असतील. त्यामध्ये एक्झिक्युटिव्ह २ आणि १८ चेअर कार डब्बे असतील. या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये एकूण १४४० आसन क्षमता आहे. मंगळवारी ही रेल्वे नांदेडमधून सकाळी ११.२० वाजता सुटून रात्री ९.५५ ला मुंबई सीएसएमटी स्थानकात पोचेल.

नांदेडहून मुंबई सीएसएमटीला दररोज सकाळी ५:०० वाजता वंदे भारत सुटेल आणि दुपारी २:२५ वाजता मुंबईला पोहोचेल. मुंबई सीएसएमटीहून दुपारी १:१० वाजता सुटेल आणि रात्री १०:५० वाजता नांदेडला पोहोचेल. ही सेवा आठवड्यातून सहा दिवस चालेल. या प्रवासादरम्यान, ही ट्रेन परभणी, जालना, औरंगाबाद, मनमाड, नाशिक रोड, कल्याण, ठाणे आणि दादर या प्रमुख स्थानकांवर थांबेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Box Office Collection : 'कांतारा' गाजवतोय अख्खं मार्केट; तर 'सनी संस्कारी'च्या कमाईत घट, कलेक्शनचा आकडा किती?

Maharashtra Live News Update : बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गातून आरक्षण मागणीसाठी भव्य महामोर्चा

Singer Passes Away: आधी बाईकवरुन अपघात, नंतर हार्ट अटॅक; प्रसिद्ध गायकाची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी

चंद्रकांत पाटलांचा निकटवर्तीय समीर पाटीलचा निलेश घायवळसोबत फोटो; रवींद्र धंगेकरांनी थेट पुरावाच दाखवला|VIDEO

ST Bus: दीपोत्सवाची एसटीकडून तयारी, पुण्यातून ५९८ अतिरिक्त बस, कुठून सुटणार एसटी?

SCROLL FOR NEXT