शिवाजीनगर पोलिसांनी दुचाकी चोर पकडला 
महाराष्ट्र

नांदेड : अट्टल चोरट्यास खंजरसह अटक; शिवाजीनगर पोलिसांची कारवाई

पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त करुन त्याला शिवाजीनगर ठाण्यात आणण्यात आले. त्याच्याविरुद्ध दुचाकी चोरीप्रकरणी सिरपली रोड निजामबाद येथे गुन्हे दाखल आहेत.

Pralhad Kamble

नांदेड : तेलंगना व नांदेड पोलिसांना पाहिजे असलेल्या अट्टल चोरट्यास शिवाजीनगर पोलिसांनी शहराच्या श्रावस्तीनगर भागातून अटक केली. त्याच्याकडून एक खंजर आणि एक चोरीची दुचाकी असा मुद्देमाल जप्त करुन शिवाजीनगर पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई रविवारी (ता. २५) जूलै) रात्री नऊच्यासुमारास केली. Nanded- thief -arrested- with- dagger-Shivajinagar- police- action

पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सहाय्यक पोलिस निरीक्षक रवी वाव्हळे हे आपल्या पथकासह रविवारी (ता. २५) रात्री गस्त घालत होते. यावेळी त्यांना श्रावस्तीनगर भागात अनिल नारायण पातरोड (वय २५) राहणार बाळापुर, तालुका धर्माबाद, हल्ली मुक्काम समतानगर, धर्माबाद हा एका दुचाकीवर संशयास्पदरित्या आढळून आला. त्याला ताब्यात घेऊन त्याची विचारपूस केली असता त्याने अनिल पाचरोड असे आपले नाव सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ विनापरवाना खंजर आणि चोरीची दुचाकी आढळून आली.

हेही वाचा - देशातील 'या' राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा तर दिल्लीला अलर्ट !

पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त करुन त्याला शिवाजीनगर ठाण्यात आणण्यात आले. त्याच्याविरुद्ध दुचाकी चोरीप्रकरणी सिरपली रोड निजामबाद येथे गुन्हे दाखल आहेत. सदरची कारवाई पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी ( शहर )चंद्रसेन देशमुख, पोलिस निरीक्षक अनंत नरुटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक रवि वाव्हूळे, हवालदार संजय मुंडे, दिलीप राठोड, बालाजी रावले, रवी बामणे, काकासाहेब जगताप आणि आवातिरक यांनी परिश्रम घेतले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

SCROLL FOR NEXT