Nanded Case Sparks Outrage Across Maharashtra Saam
महाराष्ट्र

लव्हस्टोरीचा भयानक शेवट! प्रेयसीच्या कुटुंबियांनी तडीपार प्रियकराला का संपवलं? आचंलने सगळंच सांगितलं

Nanded Case Sparks Outrage Across Maharashtra: नांदेडच्या मिलिंद नगर परिसरात प्रेम प्रकरणातून तरूणीच्या कुटुंबाने प्रियकराला संपवलं.

Bhagyashree Kamble

नांदेडच्या मिलिंद नगर परिसरात प्रेम प्रकरणातून तरूणीच्या घरच्यांनी प्रियकराची हत्या केली. पण यानंतर हे प्रकरण इथेच मिटलं नाही. तरूणीनं प्रियकराच्या डेथबॉडीसोबत लग्न केलं. प्रेयसीनं मृतदेहासोबत लग्न केलेल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दरम्यान, या प्रकरणात मयत तरूणाच्या आईने गंभीर आरोप केले आहे. जातीयवादातून मुलाची हत्या केली असल्याची तक्रार त्यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे. या घटनेनंतर हादरलं असून, संपूर्ण राज्यात या घटनेची चर्चा होत आहे.

नेमकं प्रकरण काय?

सक्षम ताटे असे मृत तरूणाचे नाव आहे. त्याचं गावातीलच आचंल नावाच्या तरूणीसोबत प्रेमसंबंध जुळलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, मुलीचे कुटुंब हे अट्टल गुन्हेगार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सक्षम ताटेला नांदेड जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलं होतं. नुकताच काही दिवसांपूर्वी तो तुरूंगातून सुटून बाहेर आला होता. त्याचं आचंल मामीडवार हिच्या घरी येणं जाणं सुरू होतं.

दोघांची ओळख झाली. तीन वर्ष हे जोडपं रिलेशनशिपमध्ये होतं. घरच्यांना दोघांच्या रिलेशनशिपबाबत माहिती मिळाली होती. अट्टल गुन्हेगार असलेल्या मामीडवार कुटुंबाने या नात्याला विरोध केला. मात्र, तरीही दोघांची लव्ह स्टोरी सुरू होती. तडीपार सक्षम मामीडवार कुटुंबाला पसंत नव्हता. याच कारणास्तव त्यांनी सक्षमचा काटा काढण्याचे ठरवले.

प्रेम प्रकरणाच्या विरोधातून मामीडवार कुटुंबाने सक्षमला संपवल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, जातीयवादातून तरूणाची हत्या केल्याचा आरोप सक्षमच्या कुटुंबाने केला. मात्र, नेमकं खरं काय? या प्रकरणाचं खरं कारण समोर आलेलं नाही. दरम्यान, सक्षमचा मृतदेह घरी आणल्यानंतर आंचलनं मोठं पाऊल उचललं. तिनं मृतदेहासोबत विवाह केला. लग्नाचे काही विधी पार पाडून तिनं सक्षमच्या डेथबॉडीसोबत विवाह केला.

'सक्षम कायम माझ्या मनात राहिल. तो जिवंत नसला तरी, आमचं प्रेम कायम जिवंत राहिल', असं म्हणत आंचलने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. आचंल या प्रकरणाबाबत म्हटली की, 'आमचं एकमेकांवर प्रचंड प्रेम होतं. परंतु दोघांची जात वेगळी होती. ही बाब माझ्या घरच्यांना मंजूर नव्हती. आमच्या प्रेमसंबंधामुळेच सक्षमची हत्या केली. आरोपींना शिक्षा झाली पाहिजे', असं आचंलने म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MNC Election: संजय राऊतांची फडणवीसांसोबत थेट ११ लाखांची पैज, नेमकं कारण काय? | VIDEO

Maharashtra Live News Update : अजित पवारांचं देवेंद्र फडणवीस यांना शायरीतून प्रत्युत्तर

Maharashtra Dry Day : तळीरामांसाठी मोठी बातमी! उद्या पासून पुढील ४ दिवस दारू दुकाने बंद; नेमकं कारण काय ?

Shiv Thakare : बिग बॉस विजेता शिव ठाकरेने गुपचूप बांधली लग्नगाठ; 'तो' फोटो शेअर करून चाहत्यांना दिली गुडन्यूज

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, ₹२००० साठी आताच करा हे काम, अन्यथा २२वा हप्ता विसरा

SCROLL FOR NEXT