nanded, nanded crime news, police, mother, son saam tv
महाराष्ट्र

Crime News : धक्कादायक ! पन्नास हजारांची सुपारी देत आईनं मुलास संपवलं; तिघे अटकेत

या प्रकरणात संशयितांनी खुनाची कबुली दिली असून बारड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संतोष जोशी

नांदेड : जन्मदात्री आईनं पोटच्या मुलाचा पन्नास हजार रुपयांची खंडणी देऊन खुन केल्याची घटना नांदेड जिल्ह्यात घडली आहे. मुलगा व्यसनाच्या आहारी जाऊन मारहाण करत होता त्यामुळे आईनं टोकाचे पाऊल उचललं. या प्रकरणी पोलिसांनी आईसह (mother) तिघांना अटक (arrest) केली आहे. (Nanded Latest Crime News)

सुशिल श्रीमंगले असं खुन झालेल्याचे नाव आहे. शोभा श्रीमंगले, राजेश पाटील, विशाल भगत असे अटक केलेल्या संशयित आरोपींचे नाव असल्याची माहिती पाेलिसांनी दिली. नांदेडच्या गिता नगर भागात राहणाऱ्या सुशिल श्रीमंगले याचा मृतदेह मुदखेड तालुक्यातील बारड शिवारात सापडला होता. पोलिस तपासात सुशिलचा गळा आवळून खून झाल्याची बाब पुढे आली.

त्याच बरोबर सुशिलचा सुपारी खुन घडवून आणणारी दुसरी तिसरी व्यक्ती कोणी नसून जन्मदात्रीच निघाली दोन किरायदाराच्या मदतीने सुशिलचा काटा काढण्यात आला. सुशिल हा आई आणि वडील यांना दारु पिऊन मारहाण करत असे आणि घर विकून पैसे मागत होता.

या त्रासाला कंटाळून आईने किरायदार असलेल्या राजेश पाटील, विशाल भगत यांना पन्नास हजाराची सुपारी देऊन खुन घडवून आणला असं पाेलिस तपासात समाेर आले आहे. या प्रकरणात संशयितांनी खुनाची कबुली दिली असून बारड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्या: सदाभाऊ खोत यांची मागणी

Shubman Gill: शुभमन गिलने इतिहास रचला, विराट कोहली आणि सर डॉन ब्रॅडमॅनचा रेकॉर्ड मोडला

Shocking : लव्ह मॅरेजनंतर ४ महिन्यांनी जवानाच्या पत्नीने आयुष्य संपवलं; इन्स्टाग्रामवर पोस्ट केला शेवटचा व्हिडिओ

Shocking : भांडणानंतर रागाच्या भरात बायको घर सोडून गेली, नंतर नवऱ्यानं आई आणि मुलांसह जे केलं ते पाहून सारेच हादरले

Eating Too Fast: घाईघाईत जेवल्याने काय होतं?

SCROLL FOR NEXT