नांदेड शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका युवकाने कुत्र्याला बेदम मारहाण करत त्याला गरागरा फिरवून आपटल्याचा प्रकार समोर आला आहे. याचा व्हिडिओ एकाने शूट करून सोशल मीडियात शेअर केला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच समाजमाध्यमांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. व्हिडिओ समोर येताच प्राणीप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
ही धक्कादायक नांदेड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. शेख इरफान असे युवकाचे नाव आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसून येत आहे, की आधी युवक कुत्र्याला बेदम मारहाण करतो. नंतर कुत्र्याच्या पायाला धरून गरागरा फिरवतो. शेवटी कुत्र्याला जमिनीवर जोरजोरात आपटतो.
युवक करत असलेल्या कृत्यावेळी आजूबाजूला ८-१० जण उपस्थित होते. मात्र या व्यक्तींपैकी कोणीही त्या अमानुष प्रकाराला विरोध केला नाही, उलट काही जण हसत असल्याचंही व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतं. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाणे आणि सायबर सेल यांनी याची स्वतःहून दखल घेतली आहे. संबंधित आरोपी शेख इरफान याचा शोध सुरू असून, लवकरच त्याला अटक केली जाण्याची शक्यता आहे.
या घटनेनंतर अनेक प्राणीप्रेमी संघटनांनी संताप व्यक्त करत आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. तसेच नेटकऱ्यांनीही या युवकाने केलेल्या कृत्याचा निषेध केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.