Nanded Spa Racket Busted AI Image
महाराष्ट्र

Prostitution Racket : धक्कादायक! स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु होता वेश्याव्यसाय, पोलिसांनी धाड टाकली अन्...

Nanded Prostitution Racket Busted : नांदेडच्या फुले मार्केट परिसरातील वेलनेस स्पा सेंटरवर LCBचा छापा. सात महिलांची सुटका, तीन पुरुषांना अटक; मालक संतोष बघे फरार.

Alisha Khedekar

  • नांदेडच्या फुले मार्केट परिसरातील वेलनेस स्पा सेंटरवर LCBचा छापा

  • कथित वेश्याव्यवसाय प्रकरणात सात महिलांची पोलिसांकडून सुटका

  • आसाममधील तीन पुरुषांना चौकशीनंतर अटक

  • स्पा सेंटरचा मालक संतोष बघे कारवाईपूर्वी फरार

नांदेडमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहरातील फुले मार्केट परिसरात वेलनेस स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी छापा टाकून नेपाळसह विविध राज्यांतील सात महिलांची सुटका केली असून, या प्रकरणात तीन पुरुषांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, स्पा सेंटरचा मालक संतोष बघे हा फरार झाला आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, फुले मार्केट परिसरातील वेलनेस स्पा सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी प्रकरणाची खात्री करण्यासाठी एका पोलिस कर्मचाऱ्याला बनावट ग्राहक म्हणून स्पा सेंटरमध्ये पाठवले. यावेळी संबंधित बनावट ग्राहकाकडून चार हजार रुपये घेण्यात आले. त्यानंतर त्याने पोलिस पथकाला ठरल्याप्रमाणे इशारा दिला.

इशारा मिळताच LCBच्या पथकाने स्पा सेंटरवर छापा टाकला. या कारवाईदरम्यान स्पा सेंटरमध्ये सात महिला आढळून आल्या. या महिलांपैकी काही महिला नेपाळ, नागालँड आणि नवी दिल्ली येथील असून, तसेच ठाणे आणि पुणे येथूनही महिला आणण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलिसांनी या सातही महिलांची सुटका केली आहे. छाप्यावेळी स्पा सेंटरमध्ये उपस्थित असलेल्या तीन पुरुषांना पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीनंतर आसाम येथील हीफझुल रहेमान, रहाज उद्दिन आणि याहीया अहेमद यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आणि स्पा सेंटरचा मालक संतोष बघे हा मात्र पोलिसांच्या कारवाईची माहिती मिळताच फरार झाला.

या प्रकरणाचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू असून, फरार मालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पथके रवाना करण्यात आली आहेत. स्पा सेंटरमध्ये नेमका किती काळापासून हा प्रकार सुरू होता, तसेच या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे. नांदेड शहरातील स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या या कथित गैरप्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रायगडमध्ये गणेश विसर्जनाला प्रारंभ

PM Kisan Yojana: ऑक्टोबरमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 2000 रुपयांचा हप्ता येणार? वाचा नविन अपडेट

Amrit Bharat : नव्या अमृत भारत ट्रेनची घोषणा; ४ राज्यातून धावणार,२० स्थानकावर थांबणार, A टू Z माहिती

चहाची टपरीवाला,भाजी विक्रेत्यालाही GSTची नोंदणी करावी लागते? जाणून घ्या नियम

घरात आढळणारी पाल खरंच विषारी असते का? चावा घेतल्यास काय करावं?

SCROLL FOR NEXT