nanded, youth  saam tv
महाराष्ट्र

After Ajit Pawar Rebel : 'आम्हांला दिलेला मतदानाचा अधिकार परत घ्या'; राजकीय घडामाेडींवर युवा वर्ग नाराज

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बदलणा-या घडामाेडींवर युवक नाराज.

Siddharth Latkar

- संजय सूर्यवंशी

Nanded News : आम्हांला दिलेला मतदानाचा अधिकार परत घ्या असे म्हणत बोटाला चुना लावत नांदेड शहरात युवा वर्गाने अनोखे आंदोलन केले. या आंदाेलनाची चर्चा शहरात जाेरदार सुरु झाली. (Maharashtra News)

राज्यात सुरु असलेल्या राजकीय नाट्यानंतर राज्यातील मतदार राजा मात्र कमालीचा वैतागला आहे. नांदेड (nanded) येथे मतदान असलेल्या युवकांनी अनोखं आंदोलन केले. सन 2019 नंतर झालेल्या निवडणुकीत आम्ही मतदान केले होते. परंतु आमच्या मताची थट्टा मांडलीय अशी भावना युवकांनी व्यक्त केली.

युवक म्हणाले राज्यात सातत्याने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री (After Ajit Pawar Rebel) बदलले जात आहेत. हा महाराष्ट्राच्या जनतेच्या जनमताचा अपमान आहे. लोकशाहीचा खून करणारा हा प्रकार असल्याची प्रतिक्रिया युवकांनी दिली.

दरम्यान आम्हांला दिलेला मतदानाचा अधिकार परत घ्या अशी मागणी युवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. यावेळी युवकांनी (youth) बोटाला चुना लावत राजकारण्यांचा निषेध नाेंदविला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

First car service: नवी कार घेतल्यानंतर पहिली सर्व्हिसिंग कधी केली पाहिजे?

'70 पैकी 35 टक्केच जंगल शिल्लक' कर्जतमधील वृक्षतोडीवर सयाजी शिंदे संतापले|VIDEO

Sweet Bor Recipe : दिवाळीचा फराळ होईल खास! बनवा कोकण स्पेशल खुसखुशीत गोड बोरं, खूपच सोपी आहे रेसिपी

Maharashtra News Live Update: भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयात पाणीटंचाईवर आढावा बैठक सुरू

WhatsApp Tips : स्मार्टफोन चोरीला गेलाय? प्रायव्हेट चॅट्स लीक होण्यापूर्वी लगेच करा 'हे' काम, अन्यथा होईल मोठा अनर्थ

SCROLL FOR NEXT