Nanded News Saam tv
महाराष्ट्र

Nanded : पाण्यासाठी महिला आक्रमक; ग्रामपंचायत कार्यालयाला महिलांनी लावले कुलूप

Nanded News : राज्यात अनेक भागामध्ये भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. यातच नांदेड जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणीटंचाईने नागरिक त्रस्त झाले आहेत

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी 
नांदेड
: नांदेडच्या हदगाव तालुक्यातील सावरगाव माळ गावातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. वेळोवेळी ग्रामपंचायतकडे पाण्याची मागणी करूनही ग्रामपंचायताने पाणीपुरवठा न केल्याने अखेर महिलांनी आक्रमक भूमिका घेतली. यात आज महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकले आहे. जोपर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत ग्रामपंचायत कार्यालयाचे कुलूप काढणार नाही असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

राज्यात अनेक भागामध्ये भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. यातच नांदेड जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणीटंचाईने नागरिक त्रस्त झाले आहेत. दरम्यान नांदेडच्या सावरगाव येथे मागील काही दिवसांपासून पाण्याची समस्या निर्माण झालेली आहे. यामुळे पाणी आणण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करण्याची वेळ आली आहे. दरम्यान ग्रामपंचायतीकडून देखील यावर काही उपाय योजना करण्यात आलेल्या नाही. 

दोन महिन्यांपासून भेडसावतेय समस्या 

सावरगाव येथे मागील दोन महिन्यापासून पाण्याची समस्या आहे. याबाबत ग्रामपंचायतला पाणी प्रश्नाबाबत वारंवार सांगत आहोत. मात्र ग्रामपंचायतीने कोणत्याही निर्णय घेतला नाही. ग्रामपंचायत कार्यालयाने पाणी पैसे घेऊन विकल आहे; असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे गावात पाणी टंचाई निर्माण झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

 अखेर ग्रामपंचायत कार्यालयावर धडक 

ग्रामपंचायत पाणी प्रश्न सोडवत नसल्याने पाण्यासाठी महिला आक्रमक झाल्या. पाणी मिळत नसल्याने महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयाला धडक देत कुलूप लावले आहे. तसेच जोपर्यंत पाणी मिळत नाही; तोपर्यंत ग्रामपंचायत कार्यालयाचे कुलूप काढणार नाही अशी भूमिका महिलांनी घेतली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sun Transit 2025: आजपासून या राशींचं नशीब पालटणार; 12 वर्षांनी सूर्य करणार गुरुच्या नक्षत्रात प्रवेश

Sunday Horoscope : भगवान विठ्ठलाची उपासना लाभदायी ठरेल; ५ राशींच्या लोकांचा दिवस आनंदी जाणार

Maharashtra Politics : राज्याचं राजकीय समीकरण बदललं, 'ठाकरे'च विरोधी पक्षाचा चेहरा? VIDEO

Maharashtra Politics : १८ वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं काय होणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

नऊवारीत सजून पारंपरिक गाण्यावर महिलांचा अफलातून डान्स; व्हिडिओ एकदा पाहाच

SCROLL FOR NEXT