Nashik : दहा महिन्यांपूर्वी नाशिकमधून रिक्षा चोरी; सीसीटीव्हीच्या आधारे अखेर मालेगावचे दोघे ताब्यात

Nashik News : दोघेजण नाशिक शहरात येऊन त्यांनी दहा महिन्यापूर्वी भद्रकाली हद्दीतून रिक्षाची चोरी केली होती. यानंतर हि रिक्षा मालेगाव येथे आणत विक्री केल्याची कबुली दिली आहे
Nashik News
Nashik NewsSaam tv
Published On

तबरेज शेख 
नाशिक
: नाशिकमधून रिक्षा चोरी केल्याची घटना दहा महिन्यांपूर्वी म्हणजे ऑगस्ट महिन्यात घडली होती. याचा पोलिसांकडून तपास सुरु असताना पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेज तपासणी करत अखेर रिक्षा चोरीचा छडा लावला आहे. रिक्षा चोरी करणाऱ्या दोघांना नाशिक पोलिसांनी मालेगाव येथून ताब्यात घेत त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. 

नाशिक शहरातील रिक्षाची चोरी करून मालेगावमध्ये विकणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने अटक केली आहे. अजीजोद्दीन रहमान मोहम्मद अकिल आणि मुस्कात शाह असे अटक करण्यात आलेल्या संशयतांची नावे आहे. दोघेजण नाशिक शहरात येऊन त्यांनी दहा महिन्यापूर्वी भद्रकाली हद्दीतून रिक्षाची चोरी केली होती. यानंतर हि रिक्षा मालेगाव येथे आणत विक्री केल्याची कबुली दिली आहे.

Nashik News
Fraud Case : नामांकित कंपनीचे बनविले बनावट लेटरहेड; शेतकऱ्याची २७ लाख रुपयात फसवणूक

१ लाख ३५ हजारचा मुद्देमाल हस्तगत 

रिक्षा चोरीबाबत पोलिसात दाखल तक्रारीवरून पोलिसांकडून शोध सुरु होता. दरम्यान सीसीटीव्ही फुटेज तपासत रिक्षा चोर मालेगाव येथील असल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने दहा महिन्यानंतर दोन्ही चोरटे पोलिसांच्या ताब्यात सापडले आहेत. पोलिसांनी दोन्ही संशयतांकडून एक लाख ३५ हजार रुपये किमतीचे मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तर हे दोघेही सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.

Nashik News
Water Crisis : पाण्यासाठी जीवघेणा संघर्ष; २०० फूट खोल दरीतून महिला आणताय पाणी; अक्राणी, अक्कलकुवा तालुक्यात भीषण पाणीटंचाई

रिक्षा, दुचाकी चोरट्याची टोळी सक्रिय 

शहरातील वस्त्यांमधून दारापुढे लावलेल्या दुचाकी तसेच रिक्षांची चोरी करणारी टोळी सक्रिय झालेली आहे. नाशिकसह धुळे, मालेगाव शहरातून दुचाकी चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. मागील काही दिवसांपूर्वी धुळे शहरातून चोरी झालेल्या दुचाकी मालेगाव मध्येच आढळून आल्या होत्या. तर आता नाशिकमधील रिक्षा चोरटे देखील मालेगाव मध्ये आढळून आले आहेत. यामुळे हि टोळी सक्रिय असल्याचे बोलले जात आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com