Nanded News Saam tv
महाराष्ट्र

Nanded News: खुल्या प्रवर्गातून विजयी; तरीही जात वैधता प्रमाणपत्र न दिल्याच्या कारणावरून केले अपात्र

खुल्या प्रवर्गातून विजयी; तरीही जात वैधता प्रमाणपत्र न दिल्याच्या कारणावरून केले अपात्र

साम टिव्ही ब्युरो

संजय सूर्यवंशी

नांदेड : नांदेडमधील निवडणूक विभागाच्या अजब कारभारामुळे एका ग्रामपंचायत (Grampanchayat) सदस्याला दोन वर्षांपासून मनस्ताप सहन करावा लागत आहे. खुल्‍या प्रवर्गातून निवडणूक लढवून विजयी झाले. तरीही (Nanded News) निवडणूक विभागाकडून जात वैधता प्रमाणपत्र न दिल्‍याच्‍या कारणावरून सदस्‍याला अपात्र करण्यात आले आहे. (Maharashtra News)

लोहा तालुक्यातील माळाकोळी ग्रामपंचायत सदस्य असलेले केशव तिडके यांनी गेली तीन वेळा सर्वसाधारण खुल्या प्रवर्गातून निवडणूक लढवून ते विजयी झाले. दोन वर्षांपूर्वी त्यांना लोहा तहसील कार्यालयाच्या निवडणूक (Election) विभागाने जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची नोटीस बजावली. मुळात सर्वसाधारण ओपन गटातून निवडणूक लढवल्याने जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तरी तिडके यांनी लोहा तहसील कार्यालय आणि नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व आवश्यक कागदपत्रे सादर केली.

तरीही जिल्‍हाधिकारींचे अपात्रचे आदेश

दोन्ही कार्यालयात झालेल्या सुनावणीस हजर राहून तिडके यांनी माहिती सादर केली. तरी पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने त्यांना अपात्र करण्यात आले. याबाबत लोहा तहसील कार्यालयात तिडके यांनी पुन्हा संपर्क केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाला कळवले जाईल, असे सांगण्यात आले. या सर्व भोंगळ कारभारामुळे मात्र गेल्या दोन वर्षांपासून तिडके यांना मनस्ताप सहन करावा लागतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : शिवसेना शिंदे गटाचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम करणार भाजपमध्ये प्रवेश...

Breast cancer: फक्त गाठ नाही तर शरीरात 'हे' बदल देतात ब्रेस्ट कॅन्सरचे संकेत; महिलांनी अजिबात दुर्लक्ष करू नये

Mumbai Metro : ठाण्याहून थेट गेट वे ऑफ इंडिया, Metro 11 प्रस्तावाला मंजुरी; किती आणि कोणती स्थानके? वाचा सविस्तर

Old Railway Tickets Viral: 'आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात' रेल्वेच्या जाड पुठ्यांची तिकीटे पाहून तुम्हीही व्हाल भावूक

लेकीचा लग्नास नकार, वडिलांनी झोपेतच मुलीला संपवलं; नंतर स्वत: नस कापली; हिंगोलीत खळबळ

SCROLL FOR NEXT