Nanded Unseasonal Rain Saam tv
महाराष्ट्र

Unseasonal Rain: पुन्हा अवकाळी पाऊस; पावसामुळे जनजीवन विस्कळीत

पुन्हा अवकाळी पाऊस; पावसामुळे जनजीवन विस्कळीत

साम टिव्ही ब्युरो

संजय सूर्यवंशी

नांदेड : राज्‍यात गेल्‍या आठवडाभरापासून अवकाळी पाऊस व गारपीट होत आहे. यात नांदेड (Nanded) जिल्ह्यात पुन्‍हा अवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे. आज देखील पाऊस (Rain) झाल्‍याने जनजीवन विस्‍कळीत झाले आहे. (Maharashtra News)

मंगळवारी सायंकाळी पुन्हा वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने नांदेड शहरासह जिल्ह्याला झोडपले. या पावसामुळे (Farmer) शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळित झाले आहे. सध्या उन्हाळा सुरू असून या उन्हाळ्यात लग्नसराई सुरू आहे. लग्न घरच्यांची या अवकाळी पावसामुळे मोठी धावपळ उडत आहे.

जिल्‍ह्यात दहा दिवसांपासून पाऊस

जवळपास दहा दिवसांपासून हा पाऊस नांदेड जिल्ह्यात बरसत आहे. या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान तर झालेच. परंतु सर्वसामान्यांचे जनजीवन देखील विस्कळित झाले आहे. बळीराजाचे देखील मोठे नुकसान अवकाळीमुळे होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Laxman Hake : ऐन विधानसभा निवडणुकीत लक्ष्मण हाके यांच्या कारवर पुन्हा हल्ला, परिसरात मोठा गोंधळ, VIDEO

Maharashtra News Live Updates: पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 12 तारखेला जाहीर सभा

World : जगातील सर्वात स्वच्छ देश कोणता? जिथे दिसत नाही कचऱ्याचे नामोनिशान

Raj Thackeray News :...तर मशिदीचे भोंगे बंद करु; राज ठाकरे पुन्हा आक्रमक

Raj Thackeray: शहराचा विचका ‌झालाय, यायला दीड तास लागला; रस्त्यांच्या परिस्थीतीवरून राज ठाकरेंची बोचरी टीका

SCROLL FOR NEXT