Nanded News Saam tv
महाराष्ट्र

Nanded : लग्नाचा मंडप टाकताना काळाचा घाला, चुलत भावांचा मृत्यू, नांदेडमध्ये शोककळा

Nanded News : आज हादगाव तालुक्यातील बोरगाव येथे दोन विवाह सोहळे होते. या लग्न सोहळ्याची गावात तयारी सुरू होती. लग्न सोहळा असल्याने गावातील तरुण मदतीसाठी गावातील युवक मंडप टाकण्याचे काम करत होते

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी 
नांदेड
: लग्न घरात सर्व तयारी झाली होती. लग्नाचा दिवस जवळ आल्याने दारापुढे लग्न मंडप टाकण्याचे काम सुरु होते. मात्र लग्न मंडप उभा राहण्यापूर्वीच विघ्न आल्याची घटना घडली आहे. दरम्यान लग्नाचा मंडप टाकताना विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने दोन जणांचा सख्ख्या चुलत भावांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.  

नांदेडच्या हातगाव तालुक्यातील बोरगाव येथे सदरची दुर्दैवी घटना घडली आहे. पांडुरंग बट्टेवाड आणि साईनाथ बट्टेवाड असे घटनेत मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. दरम्यान आज हादगाव तालुक्यातील बोरगाव येथे दोन विवाह सोहळे होते. या लग्न सोहळ्याची गावात तयारी सुरू होती. लग्न सोहळा असल्याने गावातील तरुण मदतीसाठी आले होते. यातच गावातील युवक मंडप टाकण्याचे काम करत होते. 

विद्युत तारांना स्पर्श झाल्याने अनर्थ घडला 

मंडप उभारणी करत असताना मंडपाच्या वरून जाणाऱ्या विद्युत तारेला अनावधानाने स्पर्श झाला. यामुळे विजेचा जोरदार झटका बसून सख्खे चुलत भाऊ असलेले पांडुरंग व साईनाथ बट्टेवाड यांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला लागलीच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेने हदगाव तालुक्यातील बोरगाव वर शोककळा पसरली.

महावितरणवर गुन्हा दाखल करण्याची मागणी 

दरम्यान विद्युत तारा लोमकळत असल्याने गावातील रहिवाशांनी अनेक वेळा महावितरण कंपनीकडे तक्रार केली होती. परंतु महावितरणने याकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप घटनेनंतर गावकऱ्यांनी केला आहे. संबंधित महावितरण कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा; अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: - नागपूरच्या वानाडोंगरीत ज्वेलर्सवर भरदिवसा सशस्त्र दरोडा

Raj-Uddhav Thackeray Garjana Morcha: ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधुंची 'गर्जना', आज मुंबईत मोर्चा; काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा

Monsoon Update : देशभरात पावसाने पाठ फिरवली, राज्यात ऑक्टोबर हिटने घाम फुटणार; कसे असेल आजचे हवामान? वाचा

Sunday Horoscope : डोळे झाकून विश्वास ठेवू नका; 6 राशींचे भाग्य उजळणार; वाचा रविवारचे राशीभविष्य

Chanakya Niti: आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर चाणक्यांच्या 'या' 7 गोष्टी कधीही विसरू नका

SCROLL FOR NEXT