corona 
महाराष्ट्र

नांदेडमध्‍ये दक्षिण आफ्रीकेतून आलेले तीघे कोरोना पॉझिटीव्‍ह; ओमायक्रोन संशयीत

नांदेडमध्‍ये दक्षिण आफ्रीकेतून आलेले तीघे कोरोना पॉझिटीव्‍ह; ओमायक्रोन संशयीत

संतोष जोशी

नांदेड : नांदेडमध्‍ये दक्षिण अफ्रीकेतून आलेल्‍या तीन जण ओमायक्रोनचे संशयित रुग्ण आढळले आहे. शहरातील हिमायतनगर परिसरात ते आढळले असून त्‍यांचे नमुने तपासणीसाठी पुणे प्रयोगशाळेकडे पाठवले आहेत. (nanded-news-Three-corona-positives-from-South-Africa-in-Nanded-Omycron-suspected)

नांदेडमध्ये (Nanded) दक्षिण आफ्रीकेतून (South Africa) आलेल्या तीन रुग्ण ओमायक्रोनचे संशयित रुग्ण आढळल्याने खळबळ उडालीय आहे. या तीनही रुग्णांची कोरोना (Corona) टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. हे तीनही रुग्ण हिमायतनगर येथील रहिवासी आहेत. या रुग्णांना स्वतंत्र विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

नमुने पुणे येथे रवाना

रुग्णांना ओमायक्रोनची (Omicron) लागण तर झाली नाही ना; याची तपासणी करण्यासाठी रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पुणे (Pune) येथील राष्ट्रीय विषाणू प्रयोग शाळेत पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली. तीन रुग्णाच्या संपर्कातील सर्वांच्या तपासण्या करण्यात येत असून, नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही.

आतपर्यंत आले ३०२ नागरीक

प्रत्येकाने कोरोनाचा दोन्ही लस घेण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे. ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर आता महिनाभरात विदेशातून ३०२ नागरिक नांदेडमध्ये आले आणि या नागरिकांचे कोरोना तपासण्या करण्यात आल्याची माहिती ही प्रशासनाने दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शरद पवार पुणे जिल्ह्यात करणार दुष्काळ दौरा

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT