Nanded Rain Saam tv
महाराष्ट्र

Nanded Rain : नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचे थैमान; केळीच्या बागांचे प्रचंड नुकसान

Nanded News : नांदेड जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. रात्रीच्या वेळी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी 
नांदेड
: राज्यात अवकाळीनंतर पावसाने पाठ फिरविल्याचे पाहण्यास मिळत आहे. दरम्यान काही भागात मान्सूनचे आगमन झाले असून राज्यातील अनेक भागात मॉन्सूनची प्रतीक्षा आहे. यातच नांदेड जिल्ह्यात काल रात्री झालेल्या वादळी वारा आणि पावसाने थैमान घातले आहे. यामुळे अनेक ठिकाणी झाले उन्मळून पडली आहेत. तर जिल्ह्यातील काही भागात केळी बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

नांदेड जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. रात्रीच्या वेळी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. नांदेडच्या अर्धापूर, मुदखेड तालुक्यात केळी बागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्याने केळी बागा आडव्या झाल्या आहेत. या सोबतच अनेक घरांवरची पत्रे या वादळी वाऱ्यामुळे उडाली आहेत. 

केळी उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान 

केळी सोबतच फळबागांचा देखील या तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे. अनेक शेतकऱ्यांची केळी आता काढणीला आली होती. परंतु रात्री झालेल्या वादळी वाऱ्यामुळे ह्या केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. यामुळे हातातोंडाशी आलेला घास वादळी वाऱ्यामुळे हिरावल्याने शेतकरी हतबल झाला आहे. 

नांदेड जिल्ह्यात पावसाला पुन्हा सुरुवात
नांदेड जिल्ह्यात काल रात्री वादळ वारा आणि पावसाने अक्षरशः थैमान घातलं. शेती पिकांसोबतच अनेक ठिकाणच्या रस्त्यावरची झाडे मोडून पडली आहेत. नांदेड ते भोकर या राष्ट्रीय महामार्गावर वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात झाडे मोडून पडली आहेत. ही झाडे बाजूला करण्यासाठी अद्याप प्रशासनाच्या वतीने कोणीही आलं नाही. त्यामुळे या महामार्गावरील वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - रायगडमधली परिस्थिती सामान्य झाली आहे

Politics: कोल्हापुरात राजकीय भूकंप! काँग्रेस अन् राष्ट्रवादीला मोठा धक्का; बड्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी कमळ हाती घेतलं

Nagpur News: भेंडीची भाजी पाहून नाक मुरडलं, आई रागवताच घर सोडलं; नागपुरातील मुलाचा प्रताप

Crime: घरात घुसले अन् जबरदस्ती विष पाजलं, तरुणाने मित्रांच्या मदतीने १६ वर्षीय गर्लफ्रेंडला संपवलं; नंदुरबार हादरले

Drinking Milk at Night: रात्री दूध प्यावे की नाही? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT