Nanded News Saam Tv
महाराष्ट्र

Nanded News : भावाच्या निधनाचे वृत्त कळताच बहिणीनेही सोडले प्राण; मन हेलावून टाकणारी घटना

आपला भाऊ हे जगच सोडून गेल्याचं कळल्यानंतर धक्क्याने बहिणीनेही प्राण सोडल्याची हृदयद्रावक नांदेडच्या अर्धापूर या ठिकाणी घडली आहे.

Shivani Tichkule

Nanded Latest News : बहीण भावाचं नातं एक वेगळंच असत. प्रत्येक बहिणीसाठी तिचा भाऊ खास असतो. जगातील हे अतिशय सुंदर नातं असत. वयात अगदी थोडा फार फरक पण तरीही त्या व्यक्तीचा आधार खूप महत्वाचा वाटतो.

एकमेकांचे सुख-दु:ख वाटून घेण्यासाठी भावंड नेहमीच तत्पर असतात. मात्र आपला भाऊ हे जगच सोडून गेल्याचं कळल्यानंतर धक्क्याने बहिणीनेही प्राण सोडल्याची हृदयद्रावक नांदेडच्या (Nanded) अर्धापूर या ठिकाणी घडली आहे. (Latest Marathi News)

शहरातील अहिल्यादेवी नगरातील नामदेव साखरे (वय ८५) हे गेल्या काही वर्षांपासून आजारी होते. काल (१४ मार्च) अचानक त्यांची प्रकृती अधिकच खालावली आणि त्यांचे राहत्या घरी निधन झाले. ही निधनाची बातमी त्यांच्या बहिणीसह सर्व नातेवाईकांना देण्यात आली.

नामदेव साखरे यांच्या पार्थिवावर आज (१५ मार्च) अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याने त्यांचे नातेवाईक अंत्यदर्शनासाठी जमु लागले.यावेळी आपल्या लाडक्या भावाच्या अंत्यदर्शनासाठी बहीण मथुराबाई बोरकर सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास आल्या. (Nanded News)

मात्र, भावाचा मृतदेह पाहताच त्यांना मोठा धक्का बसला आणि काही क्षमताच त्यांनी प्राण सोडले. नातेवाईकांनी मथुराबाई यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात पती, तीन मुली,एक मुलगा असा परिवार आहे. तर नामदेव साखरे यांच्या मागे पत्नी, पांच मुली, दोन मुलगे असा परिवार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fashion Street Market Mumbai: मुंबईतील फॅशन स्ट्रीट मार्केट नेमकं कुठं आहे?

बॉडी मसाज पार्लरच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय; पोलिसांना माहिती मिळताच टाकली रेड, आरोपी फरार

Bigg Boss 19 : तान्या मित्तलवर सलमान भडकला; अशनूरच्या डोळ्यात आले पाणी, 'वीकेंड का वार'मध्ये नेमकं घडलं काय?

Maharashtra Live News Update : जुन्या मुंबई पुणे हायवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी

'सुनेच्या पगारातून सासऱ्याला २० हजार रूपये मिळतील'; उच्च न्यायालयाचा निकाल, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT