Nanded ZP School Saam tv
महाराष्ट्र

Nanded ZP School: गतवर्षी बांधकाम झालेल्या शाळेचे छत कोसळले; विद्यार्थी गंभीर जखमी

Nanded News : गतवर्षी बांधकाम झालेल्या शाळेचे छत कोसळले; विद्यार्थी गंभीर जखमी

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी

नांदेड : जिल्ह्ला परिषदेची शाळा सुरु असताना शाळेचे छत अचानक कोसळले. यात एक विद्यार्थी जखमी झाला आहे. सदरची घटना (Nanded) नांदेडच्या हदगाव तालुक्यातील रावणगाव येथील (Zp School) जिल्हा परिषद शाळेत घडली. (Live Marathi News)

जिल्हा परिषद शाळांची दयनीय अवस्था हा गंभीर विषय होत चालला आहे. पडक्या, नादुरुस्त शाळा खोल्यांमध्ये वर्ग भरविले जातात. परंतु नव्याने बांधकाम झालेल्या नांदेडच्या हदगाव येथील जिल्हा परिषदेची शाळा रोजप्रमाणे भरली होती. विद्यार्थी अभ्यास करण्यात गुंग होते. अचानक गेल्यावर्षी बांधकाम पूर्ण झालेल्या इमारतीचे स्लॅब अभ्यास करणाऱ्या (Student) विद्यार्थ्यावर कोसळले. यामध्ये वैभव जाधव हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. इतर विद्यार्थी वर्गामध्ये अभ्यास करत होते. त्यामुळे सुदैवाने मोठी घटना टळली.

कारवाईची मागणी 

घटनेनंतर शाळेत एकच धावपळ उडाली. मागच्या वर्षीच या शाळेच्या इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. परंतु बोगस काम केल्याने या इमारतीचे छत कोसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. बोगस काम करणाऱ्या गुत्तेदार आणि जिल्हा परिषद अभियंत्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील गावकऱ्यांनी केली. घटना घडली असता अद्याप या शाळेला शिक्षण विभागाच्या कुठल्याही अधिकाऱ्यांनी भेट न दिल्याने गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nail Care Tips : फक्त ५ मिनिटांचा उपाय! अ‍ॅलोवेरामुळे नखे होतील मजबूत

केस लवकर वाढवण्यासाठी सकाळी की रात्री तेल कधी लावावे? योग्य वेळ काय?

Maharashtra News Live Update: पुण्यात भर पावसात काँग्रेसचं आंदोलन

Ladki Bahin Yojana : रक्षाबंधनाआधी लाडक्या बहिणींना मोठा धक्का! ₹1,500 अचानक बंद? सरकारकडून स्पष्टीकरण

High Blood Pressure : हाय बीपीच्या रुग्णांसाठी कोणती भाजी, फळ अन् पीठ सुपरहेल्दी?

SCROLL FOR NEXT