Ambarnath News: पालिका अधिकाऱ्यांना दिली चक्क हातगाडी भेट; मनसेचे अनोखे आंदोलन

Ambarnath News : पालिका अधिकाऱ्यांना दिली चक्क हातगाडी भेट; मनसेचे अनोखे आंदोलन
Ambarnath News
Ambarnath NewsSaam tv
Published On

अंबरनाथ : नेहमी वर्दळ असलेल्या अंबरनाथ स्टेशन परिसरामध्ये फेरीवाल्यांचा त्रास प्रचंड वाढला आहे. अनेक तक्रारी असून देखील (Ambarnath) नगरपालिका याकडे दुर्लक्ष करत आहे. यामुळे मनसेने (MNS) आज अनोखे आंदोलन करत फेरीवाल्यांना संरक्षण देणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांना चक्क हातगाडी भेट देण्यात आली. (Latest Marathi News)

Ambarnath News
Nagpur Crime News : महिलेने पतीचा मृतदेह ॲम्बुलन्सने गावी नेला; मागे चालकाचं लेकाच्या मदतीने संतापजनक कृत्य, पोलीसही हादरले

अंबरनाथ शहरात फेरीवाल्यांचा त्रास प्रचंड वाढला आहे. ज्या ठिकाणी अंबरनाथ नगरपालिकेच कार्यालय आहे. त्याच कार्यालयाच्या अवघ्या १०० मीटर अंतरावर फेरीवाल्यांचा विळखा आहे. तसेच रेल्वे स्टेशन परिसरात देखील मोठा त्रास सहन करावा लागतो. असे असतानाही पालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी या फेरीवाल्यांवर कोणतीही कारवाई करीत नाही. 

Ambarnath News
Dhule BJP Shivsena Controversy: भाजप मंत्र्याचे रोज पुतळे जाळू, शिंदे गटाचा भाजपला इशारा; वादाच्या ठिणगीचे काय आहे कारण

मनसेचे आंदोलन 

स्टेशन रोड पूर्णपणे फेरीवाल्यांनी व्यापला असून रात्रीच्या वेळेस कामावरून परत येणाऱ्या प्रवाशांना चालण्यासाठी जागा देखील शिल्लक राहत नाही. या फेरीवाल्यांच्या जाचातून अंबरनाथकरांची सुटका व्हावी; यासाठी आज मनसेचे शहराध्यक्ष कुणाल भोईर आणि आदिल खान यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. यावेळी कार्यालयात उपस्थित असलेले अतिरिक्त मुख्याधिकारी त्यांच्या टेबलावर प्रतिकात्मक हात गाडी ठेवून फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com