Nashik Police News : महिला पाेलीसांची जबरदस्त कामगिरी, हातभट्टी दारूचे 32 अड्डे उध्वस्त

या महिला पथकाने आता पर्यंत केलेल्या कारवाईचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
nashik,
nashik, saam tv
Published On

- अजय सोनवणे

Nashik News : नाशिक जिल्ह्यातील ग्रामिण भागात सुरू असलेल्या हातभट्टी व्यावसायिकांचे उच्चाटन करण्यासाठी ग्रामीण जिल्हा पोलिस प्रमुखांनी स्थापन केलेल्या ४ पथकातील महिला पोलिसांनी पुन्हा एकदा आपली कामगिरी सिध्द केली आहे. या पथकाने जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ३२ हातभट्टीचे अड्डे उध्वस्त केले. (Maharashtra News)

nashik,
Swabhimani Shetkari Sanghatana : गायब झालेल्या 'स्वाभिमानी' च्या प्रशांत डिक्कर यांचा व्हिडिओ व्हायरल, सरकारला दिला अल्टीमेटम

या चार पथकांत आठ महिला अंमलदारांचा समावेश आहे. या सर्व पथकांचे नेतृत्व अतिरिक्त पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे (madhuri kangane) यांच्याकडे देण्यात आले आहे. या पथकाने इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खेडभैरव, देवाचीवाडी, पिंपळगाव घाडगा, चिंचलेखैरे, देवळे आणि तळेगाव या दुर्गम भागांतील गावठी दारू हातभट्टीचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत.

nashik,
Gokul Dudh Sangh : 'गोकुळ' ला उच्च न्यायालयाचा दणका, आजपासून सभासदांना भेटणार : शाैमिका महाडिक (पाहा व्हिडिओ)

याप्रकरणी ३२ संशयितांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. आता पर्यंत जवळपास १२ लाख रुपयांचे हातभट्टी दारु, रसायन व साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. या महिला पथकाने आता पर्यंत केलेल्या कारवाईचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com