Nanded News
Nanded News Saam tv
महाराष्ट्र

Nanded News: पोलिस उपनिरीक्षकाची नदीत उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न

संतोष जोशी

नांदेड : पोलिस उपनिरीक्षकाची नदीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. नांदेड (Nanded) शहरातील ही धक्कादायक घटना असून स्थानिकांनी वाचवून रुग्णालयात दाखल केले. परंतु, आत्महत्येचा प्रयत्न करण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. (Tajya Batmya)

नांदेडच्या गोदावरी नदीवरील (Godavari River) पुलावरून एका पोलीस उपनिरीक्षकाने उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. शेषराव राठोड असे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे. आत्महत्येचा कारण अद्याप अस्पष्ट असून नांदेडच्या पोलिस मुख्यालयात राठोड काही दिवसांपासून कार्यरत होते.

उडी मारल्‍याचे लक्षात येताच

दुपारच्‍या सुमारास गोदावरी नदीवरील गोवर्धन घाट पुलावरून कुणीतरी उडी मारल्याचे लक्षात आल्यानंतर माजी सैनिक असलेले बलजितसिंग बावरी यांनी तातडीने मदतकार्य राबवून राठोड यांना नदी बाहेर काढले. राठोड यांची प्रकृती गंभीर आहे. गुरुगोविंदसिंघ शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. राठोड यांच्या निवृत्तीला काही महिने शिल्लक असताना त्यांनी ऐवढ्या टोकाचे पाऊल का उचलले याची चर्चा आहे.

नरवाडी शिवारात तरुणाची हत्या

परभणीच्या सोनपेठ नरवाडी शिवारात एका 27 वर्षीय सोमेश्वर रोड नावाच्या युवकाचा मृतदेह संशयीतरित्या आढळून आला आहे. मयत तरुणाचा वडिलाच्या तक्रारी वरून अज्ञात आरोपी विरोधात सोनपेठ पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol Diesel Rate (6th May 2024): निवडणूक काळात पेट्रोल-डिझेलच्या किमतीत घट? जाणून घ्या राज्यातील आजचा भाव

Sambhajinagar Accident : लग्न सोहळ्याहून परत येताना आई-मुलावर काळाचा घाला; टेम्पोची दुचाकीला धडक

Breaking News: अमेठीत काँग्रेस कार्यालयाबाहेर उभ्या असलेल्या १० ते १२ वाहनांची तोडफोड; भाजपवर गंभीर आरोप

Crime News: पत्नीनेच दिली पतीच्या हत्येची सुपारी.. प्रियकराच्या मदतीने काढला काटा; ४ जण अटकेत

Buldhana Accident : ट्रक- डंपरची धडक; एकाचा जागीच मृत्यू, दोन गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT