Nanded News Saam tv
महाराष्ट्र

Painganga River Flood : मराठवाडा- विदर्भाचा संपर्क तुटला; पैनगंगा नदीला पूर, माहूर जवळील पुलावरून पुराचे पाणी

Nanded News : नांदेड, हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीला मोठा पूर आला आहे

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी

नांदेड : नांदेड जिल्ह्यात पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे दाणादाण उडविली आहे. रात्रभर चाललेल्या पावसामुळे पैनगंगा नदीला मोठा पूर आला असून माहूर जवळील पुलावरून पुराचे पाणी वाहत आहे. परिणामी मराठवाडा व विदर्भचा संपर्क तुटला आहे. 

नांदेड (Nanded), हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीला मोठा पूर आला आहे. पाण्याची पातळी अधिक वाढल्याने नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. या पुराचे पाणी नांदेड जिल्ह्यातील माहूरजवळ असलेल्या पुलावरून वाहत असल्याने मराठवाडा आणि विदर्भाचा संपर्क तुटला आहे. दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. पुराचे पाणी ओसरल्यानंतरच महामार्गावरील वाहतूक सुरळीत होणार आहे. 

नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा 

रात्रीपासून जोरदार पाऊस (Rain) सुरु असल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. यामुळे पैनगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. दरम्यान नदीने धोक्याची पातळी ओलांडली असल्याने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोणी नदीच्या परिसरात जाऊ नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Singham Again Vs Bhool Bhulaiyaa 3: रूह बाबा की सिंघम, बॉक्स ऑफिसवर कुणाची चलती?

Hemoglobin: हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी काय खावे? जाणून घ्या...

Mumbai News: गोरेगावमध्ये टेम्पोत मोठा स्फोट, एकाचा दुर्दैवी मृत्यू; नेमकं काय घडलं?

Jalgaon News: जळगावात पोलिसांची मोठी कारवाई, तब्बल १५ लाखांची रोकड जप्त

Maharashtra News Live Updates: सोलापूरमध्ये भाजपचा काँग्रेसला मोठा धक्का

SCROLL FOR NEXT