Nanded Crime News Saamtv
महाराष्ट्र

Nanded News: खळबळजनक! तलावात आढळला माय-लेकीचा मृतदेह; अपघात की घातपात? तपास सुरू

हे मृतदेह सापडल्यानंतर हा घातपात आहे की, अपघात याबाबत तर्क वितर्क लढविले जात आहेत.

Gangappa Pujari

संतोष लक्ष्मणराव जोशी..

Crime News: नांदेडमधील माहुरच्या तलावात माय -लेकीचा मृतदेह आढळल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. फुलनबाई शिंकीराम मोरे आणि नर्मदा प्रकाश पजई असं मृत माय लेकीची नावे आहेत. या बातमीने सध्या परिसरात खळबळ उडाली असून ही घटना घातपात की अपघात असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. (Nanded News)

याबाबत अधिक माहिती अशी की, परभणी जिल्ह्य़ातील चारठाणा येथून निघालेली 65 जणांची दिंडी घेऊन माहूर येथे पोहचली. देवदर्शनानंतर ही दिंडी आज परतीच्या प्रवासासाठी निघत असताना फुलनबाई आणि नर्मदा या मायलेकी त्यामध्ये दिसल्या नाहीत. त्यामुळे दिंडी प्रमुखाने पोलिसांना याबाबतची माहिती दिली.

त्यानंतर आज( १०, फेब्रूवारी) पांडवलेणी परिसरातील तलावात दोन मृतदेह सापडले असून ते मृतदेह फुलनबाई शिंकीराम मोरे आणि नर्मदा प्रकाश पजई या दोन मायलेकींचे असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

हे मृतदेह सापडल्यानंतर हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या निर्मनुष्य ठिकाणी या माय लेकी का गेल्या याचे गुढ अद्याप उकलले नाही. त्यामुळे हा घातपात आहे की, अपघात याबाबत तर्क वितर्क लढविले जात आहेत.

दरम्यान पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच वस्तुस्थिती पुढे येईल, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Tourism : महाराष्ट्रातील 'या' धबधब्यावर शाहरुख खानने केली धमाल, तुम्ही कधी गेलात का?

Shocking: अपहरण करून शेतात फरपटत नेलं, अत्याचारानंतर मुलीला तडफडवलं; ८ वर्षीय चिमुकलीची निर्घृण हत्या

माझी बायको घर सोडून गेली, मी जिवंत राहणार नाही; पाण्याच्या टाकीवर चढून नवऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Instagram : Instagram वर पॉपुलर होण्यासाठी फॉलो करा या 7 सुपरहिट स्टेप

Bigg Boss 19 : बिग बॉस 19 मध्ये 'तारक मेहता का उलटा चश्मा'मधील 'या' सदस्याची एन्ट्री, कोण आहे ती?

SCROLL FOR NEXT