Nanded News Saam tv
महाराष्ट्र

Nanded : मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ महालक्ष्मी सणावर विरजण; मराठा महिलांनी घेतला निर्णय

Nanded News : आंदोलनाला राज्यभरातून मराठा समाज बांधवांचा पाठींबा मिळत असून समाज बांधव मुंबई देखील दाखल झाले आहेत. दरम्यान मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी नांदेडमध्ये महिला देखील आक्रमक

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी 

नांदेड : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले असून त्यांना मराठा समाजाकडून पूर्ण पाठिंबा दिला जात आहे. तर आंदोलनाच्या समर्थनार्थ गौराई अर्थात महालक्ष्मीचा सण साजरा न करण्याचा निर्णय अर्धापूर तालुक्यातील उमरी येथील मराठा महिलांनी घेतला आहे. आमचा वाघ चार दिवसापासून उपाशी आहे; मग आम्ही सण का साजरा करायचा? अशा भावना महिलांनी व्यक्त केल्या. 

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर चार दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरु केले आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी करण्यात येत असलेल्या आंदोलनाला राज्यभरातून मराठा समाज बांधवांचा पाठींबा मिळत असून समाज बांधव मुंबई देखील दाखल झाले आहेत. दरम्यान मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी नांदेडमध्ये महिला देखील आक्रमक झाल्याचे पाहण्यास मिळाले. 

आंदोलनाच्या समर्थनार्थ महिलांचा निर्णय 

राज्यभरात गौराई अर्थात महालक्षिम्यांचा सण मोठ्या उत्साहात साजरा आहे. तर दुसरीकडे नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील उमरी येथील महिलांनी महालक्ष्मीचा सण साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ हा निर्णय घेण्यात आला आहे. उमरी या गावातून अनेक मराठा बांधव आंदोलनासाठी मुंबई येथे गेले आहेत.

दरम्यान आमचा वाघ मुंबई येथे चार दिवसापासून उपाशी आहे. आमच्या लेकरा बाळांची मुंबई येथे गैरसोय होत आहे. त्यामुळे आम्ही महालक्ष्मीचा सण साजरा न करण्याचा निर्णय घेतल्याचे येथील महिलांनी सांगितले. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी या गावातील महिला देखील आक्रमक झालेल्या असून आंदोलनांना पूर्ण पाठिंबा असल्याचे महिलांनी यावेळी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जालना शहर महानगरपालिकेचा प्रारूप प्रभाग रचना जाहीर

Mumbai : खेळण्यासाठी बाहेर गेला तो घरी परतला नाही; वर्सोवा पोलिसांच्या तत्परतेने हरवलेला मुलगा सुखरूप

TET Exam: आता उतारवयात 'या' शिक्षकांना द्यावीच लागणार टीईटी; दोन वर्षात पास न झाल्यास मोठी कारवाई

Pankaj Tripathi : "नातेसंबंध आणि बँक अकाऊंट ओपन कसे राहू शकतात?" पंकज त्रिपाठी यांचे रिलेशनशिपवर परखड मत

Crime News : मित्रानेच केली मित्राची हत्या; फरार झालेल्या आरोपीला १२ तासांच्या आत बेड्या

SCROLL FOR NEXT