Amalner Crime : जन्मदात्या बापाला मुलाने संपविले; खुनाच्या घटनेने अमळनेरात खळबळ

Jalgaon Amalner News : रात्री साडे नऊ वाजेपुर्वी घटना घडली. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित मुलाला अटक करण्यात आली आहे.मात्र, खुनाचे नेमके कारण समजू शकले नाही. 
Amalner Crime
Amalner CrimeSaam tv
Published On

अमळनेर (जळगाव) : वडील आणि मुलामध्ये कोणत्या तरी क्षुल्लक कारणातून वाद निर्माण झाला. या वादातून मुलाने जन्मदात्या बापाच्या डोक्यात लोखंडी हातोडीने वार करत हत्या केल्याची घटना अमळनेर शहरातील शिरूड नाका परिसरात रात्रीच्या सुमारास घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे. 

अमळनेर शहरातील शिरुड नका परिसरात असलेले राजेंद्र दत्तात्रय कासार (वय ६४) असे घटनेत मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सदरची घटना ३१ ऑगस्टला रात्री साडेदहाच्या सुमारास उघडकीस आली. रात्रीच्या सुमारास राजेंद्र कासार व त्यांचा मुलगा भूषण यांच्यात रात्रीच्या सुमारास क्षुल्लक कारणातून वाद सुरु झाला होता. यामुळे संताप अनावर झालेल्या भूषणने घरात पडलेली लोखंडी हातोडी घेत वडिलांच्या डोक्यात जोराने वार केले. 

Amalner Crime
Yavatmal : तलठ्याची शेतकऱ्यांशी अरेरावी; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, अतिवृष्टीच्या यादीवरून वाद

रक्ताच्या थारोळ्यात पडून 

डोक्यात वार करण्यात आल्याने राजेंद्र कासार हे जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळले. घटनेची माहिती पोलिसांना कळविली. यानंतर पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे, सपोनि सुनील लोखंडे, पोलिस उपनिरीक्षक शरद काकळीज पथकासह घटनास्थळी दाखल झाले. यानंतर राजेंद्र यांना ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. 

Amalner Crime
Shivbhojan Thali : चंद्रपुरात शिवभोजन योजनेला घरघर; सहा महिन्यांपासून अनुदान न मिळाल्याने थाळी बंद

मारेकरी मुलगा ताब्यात 

पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरात चौकशी केली असता राजेंद्र याचा मुलगा भूषण यानेच त्याच्या डोक्यात लोखंडी हातोडी टाकून मारले असल्याची माहिती मिळाली. यानंतर फॉरेन्सिक पथकाने घटनस्थळवरून काही नमुने घेतले व लोखंडी हातोडी जप्त करण्यात आली. तर भूषण याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. मात्र, खुनाचे नेमके कारण समजू शकले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com