Nanded News Manoj Jarange Patil warns Devendra Fadnavis about withdrawal of cases against Maratha protesters Saam TV
महाराष्ट्र

Manoj Jarange: फडणवीस साहेब थोडं थांबा, तुम्हाला त्या गोष्टीचा पश्चाताप होईल; मनोज जरांगेंनी कोणता संदर्भ दिला?

Manoj Jarange on Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागेल", असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. ते नांदेडमध्ये बोलत होते.

Satish Daud

Manoj Jarange on Devendra Fadnavis

जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटी गावात पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या तसेच आरक्षणासाठी रस्त्यावर जाळपोळ करणाऱ्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार नाही, अशी स्पष्ट भूमिका गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. सर्व बाबींची माहिती घेतल्यानंतर गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया केली जाईल, असं लेखी निवेदन देखील फडणवीसांनी विधानसभेत दिलं.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

फडणवीसांच्या या भूमिकेमुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन देऊनही फडणवीसांनी ऐनवेळी आपली भूमिका बदलल्याचा आरोप केला जात आहे. यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

"देवेंद्र फडणवीस आपलं स्टेटमेंट बदलतील, ते त्यांच्या मूळ भूमिकेवर येतील. जर नाही आले, तर त्यांनाही मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागेल", असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. ते नांदेडमध्ये बोलत होते.

"एका व्यक्तीच्या (भुजबळाच्या) दबावाखाली येऊन आपण असं स्टेटमेंट करीत असाल, तर तुम्ही थोडं थांबा फडणवीस साहेब मराठा काय आणि महाराष्ट्र काय, तुमच्या लक्षात येईल. त्यावेळी तुम्हाला वाटेल, की याचं (भुजबळांचं) उगाच ऐकलं", असं जरांगे म्हणाले.

"आरक्षण मिळवण्याची खरी ताकद सर्वसामान्य माणसांमध्ये आहे. पांढरे कपडे घालणाऱ्यांमध्ये नाही. कारण, आम्हाला आमच्या लेकरांचे दु:ख त्यांच्या वेदना माहित आहेत. त्यामुळे सामान्य मराठा काय करू शकतो, हे नेत्यांना देखील माहित आहे", असंही जरांगे म्हणाले.

मंत्री छगन भुजबळ आज इंदापुरात ओबीसींची एल्गार सभा घेणार आहेत. याविषयी जरांगे यांना विचारलं असता, "लोकशाहीत सभा घेण्याचा कुणालाही अधिकार आहे. पण वयाचा विचार करून बोललं पाहिजे. दंगली घडतील अशा गोष्टी माणसाने बोलू नये", असा सल्लाही जरांगे यांनी भुजबळांना दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र लढणार

Designer Sarees: न्यू ईअर पार्टीला सगळ्यात हटके दिसायचंय? मग या ४ लेटेस्ट डिझाइनर साड्या आत्ताच करा खरेदी

Pune : ना जागावाटप, ना उमेदवार; नुसत्याच चर्चा, जोरबैठका; पुण्यात कन्फ्युजनही कन्फ्युजन, सोल्यूशनचा पत्ताच नाही!

गुप्त ठिकाणी बैठक, हातात बंद लिफाफे मनसे आणि ठाकरे गटात नेमकं काय घडतंय? VIDEO

T20 World Cup : ३६ चेंडूंत १००, ८४ चेंडूंत १९० धावा; वैभव सूर्यवंशीला टी २० वर्ल्डकप संघात घ्या, दिग्गज खेळाडूची मागणी

SCROLL FOR NEXT