Mahur Ghat Accident Death Toll 
महाराष्ट्र

माहूर घाटात टेम्पो दरीत कोसळला, ३ भाविकांचा मृत्यू, ५ गंभीर; रेणुका मातेचे दर्शन घेऊन येताना काळाचा घाला

Mahur Ghat Accident Death Toll : नांदेड जिल्ह्यातील माहूरच्या किरोळी घाटात भाविकांचा टेम्पो दरीत कोसळून भीषण अपघात झाला. रेणुका मातेचे दर्शन घेऊन यवतमाळला परतणाऱ्या तीन भाविकांचा मृत्यू झाला.

Namdeo Kumbhar

संजय सुर्यवंशी |नांदेड प्रतिनिधी| साम टीव्ही मराठी

Mahur Ghat tempo accident latest news : रेणुका मातेचे दर्शन घेऊन यवतमाळकडे परतणाऱ्या भाविकांच्या टेम्पोला नांदेड जिल्ह्यातील माहूर येथील किरोळी घाटात भीषण अपघात (Nanded road accident) झाला आहे. हा अपघात पहाटे पाच वाजताच्या सुमारास झाल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. (Yavatmal devotees accident while returning from Renuka Mata temple)

यवतमाळ येथील काही भाविक माहूर येथे श्री रेणुका मातेच्या दर्शनासाठी आले होते. दर्शन आटोपून ते टेम्पोने पुन्हा यवतमाळच्या दिशेने परतत होते. यादरम्यान, किरोळी घाटातील एका नागमोडी वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि भरधाव टेम्पो थेट दरीत कोसळला.

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच पोलिसांनाही याबद्दलची माहिती देण्यात आली. त्यानंतर स्थानिक नागरिक, क्रेन आणि पोलिसांच्या मदतीने बचावकार्य राबवण्यात आले. दरीत कोसळलेल्या टेम्पोमधून जखमींना आणि मृतदेह बाहेर काढण्यात आले.

या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून, पाच गंभीर जखमी भाविकांना तातडीने माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. ऐन सणासुदीच्या काळात घडलेल्या या दुर्घटनेमुळे यवतमाळ आणि माहूर परिसरात शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अल्पसंख्यांक संस्थांना पवित्र पोर्टल द्वारे नियुक्त करणे बंधनकारक नाही, हायकोर्टाचा निर्णय

Brown Egg Vs White Egg: तपकिरी की सफेद, कोणती अंडी आरोग्यासाठी सर्वात पौष्टिक?

Shocking: शाळेमध्ये अंदाधुंद गोळीबार, ३ विद्यार्थी आणि शिक्षकाचा मृत्यू

Petrol Diesel : दिवाळीआधी केंद्र सरकारचा मोठा निर्णय! पेट्रोल-डिझेलच्या टॅक्समध्ये बदल; तुमच्या खिशावर होणार का परिणाम?

Musician Death: संगीत विश्वाला मोठा धक्का! प्रसिद्ध संगीतकाराचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

SCROLL FOR NEXT